CM Eknath Shinde : साखर कारखाना हे मंदिर, या मंदिरातला देव हा शेतकरी आहे, कामगार पुजारी आहे, संचालक मंडळ सेवेकरी आहे. जर खऱ्या अर्थाने असा जर आपण कारखाना चालवला तर हा पहिला कारखाना नाही, तुमचे धडाधड एक दोन तीन चार दहा वीस कारखाने होतील हे सगळे लोक जे आहेत हे तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, यासाठी सरकार देखील चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नाशिक (Nashik) शहराजवळील पळसे येथील सहकारी साखर कारखाना (Sugar Cane) आज गाळप हंगामी शुभारंभ झाला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते, ते यावेळी म्हणाले आज चांगल्या मुहूर्तावर या गळीत हंगामाला सुरुवात होती आहे. आज वसुबारस (Vasubaras) असून दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे म्हणून दिवाळीच्या देखील सगळ्यांना शुभेच्छा. आज वसुबारस असल्यामुळे येताना एका शेतकऱ्याच्या घरी गोमातेचे देखील आम्ही पूजन करून इथे आलेलो असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


ते पुढे म्हणाले साखर कारखाने आले तिथे एक चांगलं वातावरण तयार होते. गेल्या महिन्यातच आम्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गाळप  हंगामाबाबत बैठक घेतली आणि आपण महिनाभर 15 ऑक्टोबर पासून गाळात सुरू करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला. गेल्या हंगामामध्ये सुमारे 200 साखर कारखान्यांनी गाळत घेतलं. शेतकऱ्यांना जवळपास 42 हजार 650 कोटी रुपयांची एफआरपी दिली गेली. आपल्या राज्यात देशात सर्वाधिक 98 टक्के एफआरपी दिली गेली. यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड सुमारे 15 लाख हेक्टर वरून ऊस लागवडीचे क्षेत्र देखील वाढले. जवळपास सरासरी 95 टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामामध्ये देखील सुमारे 203 कारखाने सुरू होतील. 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आणि महाराष्ट्रात गेल्या हंगामात 137 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन केलं असून उत्तर प्रदेशला देखील आपण मागे टाकलं एक चांगली सुरुवात आहे. देशात सध्या 60 लाख मेट्रिक टन साखरेचा साठा असून या ठिकाणी 30 लाख मॅट्रिक टन आपला महाराष्ट्र मध्ये आहे. एकदा महाराष्ट्रामध्ये आणि यंदा देशातून शंभर लाख मॅट्रिक टन साखर भारतातून निर्यात होण्याचा अंदाज असून त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा सगळ्यात जास्ती 60 लाख मेट्रिक टन होऊ शकतो. 


खासदार हेमंत गोडसे तसेच महसूल मंत्री विखे पाटील यांनी नमूद केले कि,  इथेनॉल जो आहे 5 टक्केवरून दहा टक्के, दहा टक्क्यावर वीस टक्के भविष्यामध्ये वाहन देखील पूर्ण इथेनॉलवरच चालतील आणि त्यामुळे हा जो काही इथेनॉलचे उत्पादक आहे. हे आपल्या साखर कारखान्याला मदतीचा देखील सहकार्य ठरणार आहे. त्याचबरोबर हरिगिरी महाराज यांनी सांगितल्या प्रमाणे आगामी कुंभमेळा संदर्भात निश्चित रहा, सरकारमार्फत योग्य ते नियोजन केले जाईल नाशिक नगरीत कोणतीच गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, या संदर्भात लवकरच राज्य सरकार बैठक घेणार असून त्यादृष्टीने नियोजन केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


तसेच ते पुढे म्हणाले, या राज्याच्या निर्मितीमध्ये, राज्याच्या विकासामध्ये आहे. शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कॅबिनेटमध्ये काल भूविकास बँकेचे 964 कोटी माफ केले आजवर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे आणि हे सगळं करत असताना एकच आपला सरकारचा उद्देश आहे हे सरकार सर्व सामान्य लोकांचा हे सरकार शेतकऱ्यांचा आहे.  कष्टकऱ्यांचा, वारकऱ्यांचा, सर्वसामान्य माणसांचा आणि म्हणून आपल्याला माहित आहे जे काय आम्ही तीन महिन्यापूर्वी सरकार स्थापन केलं. त्या सरकारने मंत्रिमंडळ विस्तार व्हायच्या अगोदर म्हणेजच तीन महिन्यांमध्ये 72 मोठे निर्णय आपण घेतले, 400 पेक्षा जास्त जीआर आपण काढले . 


गोरगरिबांची दिवाळी गोड झाली पाहिजे... 
आमचं सरकार वर्क विदाऊट होम करत असून आम्ही घरात न बसता रस्त्यावर लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी रस्त्यावर येऊन उतरून मदत करतो आहे. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आपण पाहिला जर सरकार बदललं नसतं तर गणपती उत्सव झाला असता का? म्हणून दिवाळीत देखील लोकांची दिवाळी गोड झाली पाहिजे, म्हणून सरकार निर्णय घेतलाअसून सर्वांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचवला जात आहे. आपलं साहित्य पोहोचलं नाही, ते तातडीने पोहोचवा दिवाळीच्या पूर्वी सगळं साहित्य पोहोचलं पाहिजे, गोरगरिबांची दिवाळी त्यांची गोड झाली पाहिजे, लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी घेतलेला निर्णय आहे. या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचं काम आपल्याला करावे लागेल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.