Nashik Accident : इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात अपघातांचे सत्र सुरूच असून आज सकाळी मजुरांना घेऊन जाणार ट्रक उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दहा मजूर जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी मिळाले आहे. सकाळपासून इगतपुरी परिसरासह नाशिक (Nashik) जिल्ह्यातील हा तिसरा अपघात (Accident) असून काल रात्रीच्या सुमारास घाटनदेवी परिसरात झालेल्या अपघातात तीन मित्रांना आपला जीव गमावावा लागला. त्यानंतर आज सकाळच्या सुमारास पोलिसांच्या बोलेरो जीपला अपघात झाल्यानंतर पोलीस किरकोळ जखमी झाले. त्यानंतर आता मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाल्याने अपघातांचे सत्र सुरू असल्याचे चित्र आहे.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणाजवळ कॅनॉल दुरुस्तीचे काम सुरू आहे त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला व पुरुष मजुरांना हा ट्रॅक्टर घेऊन जात होता. ट्रॅक्टर कॅनल जवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट कॅनॉल मध्ये उलटला. यावेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या अनेक मजूर बाहेर फेकले गेले. महत्त्वाचं म्हणजे कॅनॉल बंद असल्याने जीवित हानी टळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मजूर जखमी झाल्याने स्थानिक नागरिकांनी जखमी मजुरांना मदत करून उपचारासाठी वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सद्यस्थितीत दहा मजूर जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


दरम्यान काल रात्रीच्या भीषण अपघातानंतर आवाज सकाळी वाडीवऱ्हे जवळ पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात झाला. यामध्ये दोन ते तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती असून त्यांना वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर लागलीच वैतरणा डॅम परिसरात काम करण्यासाठी आलेल्या मजुरांच्या ट्रॅक्टरला अपघात झाला. रस्त्याने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट कॅनॉलमध्ये जाळ उलटला. कॅनॉलमध्ये पाणी नसल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. नाशिक मुंबई महामार्गावर गोंदेजवळ पोलिस वाहनाला अपघात झाला आहे. नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पथक मुंबई हायकोर्टात जात असतांना घटना घडली. दुसऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत पोलिसांचे बलेरो वाहन उलटल्याने अपघात झाला. सुदैवाने तिन पोलीस कर्मचारी बचावले आहेत. 


अपघातांचे सत्र सुरूच.... 
इगतपुरी तालुक्यात मंगळवारी व बुधवारी सलग तीन ठीकाणी वेगवेगळे अपघात झाले असून या अपघातात तीन जणांचा बळी गेला असून अनेक जन जखमी झाले आहेत. त्यामुळे अपघातांचे सत्र सुरू झाले की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे. बुधवारी सकाळी वैतरणा धरणाजवळ मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर अचानक पलटी झाला. या अपघातात 10 मजूर जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मुंबई आग्रा महामार्गाजवळील इगतपुरी येथील सह्याद्रिनगर समोर झालेल्या भीषण अपघातात इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे येथील तीन युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला इगतपुरी (Igatpuri) ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असुन या अपघातामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.