Nashik News : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी जात असलेल्या दोन गटामध्ये कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला असून यावेळी भर रस्त्यात चोप दिला आहे. नाशिक मुंबई महामार्गावर ही घटना घडली असून यामुळे काही काळ नाशिक मुंबई महामार्गावर तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.  


दरम्यान नाशिक मुंबई महामार्गावर एका बसमधील आणि खाजगी वाहनातील दोन गटात काही कारणामुळे वाद झाल्याने चारचाकीतील प्रवाशांना भर रस्त्यात चोप दिला आहे. खाजगी बस ही मुंबईच्या दिशेने जात होती. यावेळी कसारा घाटाच्या पुढे शहापूरच्या जवळपास हा राडा बघायला मिळाला. बसमधून अनेक जात असताना बाजूने जाणाऱ्या खाजगी वाहनातील प्रवाशांनी अश्लील हावभाव करत डिवचल्याचा आरोप महिलांनी केला आहे. त्यामुळे महिलांनी गाडी थांबवून खाजगी वाहनातील प्रवाशी पुरुषांना भर रस्त्यात चोप दिला आहे. नाशिक मुंबई महामार्गावर यावेळी जोरदार राडा झालेला बघायला मिळाला. याचा कारण ठरलंय ते म्हणजे या प्रवाशांनी चालत्या वाहनांमधून अश्लील इशारे केल्याचा आरोप बसमधील महिलांनी केला. त्यानंतर या महिलांनी आपली गाडी थांबवत  त्यानं याबाबत जाब विचारला. 


नाशिक मुंबई महामार्गावरील घटना 
नाशिक मुंबई महामार्गावरून जेव्हा ही महिलांची बस जात होती. त्याचवेळी बाजूने जात असलेल्या वाहनांमधील पुरुष प्रवाशांनी महिलांकडे बघून काही चित्र विचित्र हातवारे केले. त्यामुळे महिलांनी गाडी थांबवत वाहनातील हातवारे करणाऱ्यांना बाहेर काढत जोरदार चोप दिला आहे. मात्र काही वेळातच काही रस्त्याने जाणाऱ्यानी महिलांना थांबवत वाद मिटवण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळातच ते पुढील दिशेने मुंबईकडे रवाना झाले. मात्र दोन्ही वाहने कोणत्या जिल्ह्यातून आली आहेत, हे मात्र समजू शकले नाही.