Nashik Dasara Puja : आज देशभरात मोठ्या उत्साहात दसरा सण (Dasara)  साजरा केला जात असून विजयादशमी (Vijayadashami) निमित्ताने नाशिकच्या (Nashik) पोलिस मुख्यालयातील (CP Office) शस्रागारात पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) यांनी आज सकाळी विधिवत रित्या शस्रपूजन करत देवीची आरती केली. त्याचबरोबर नाशिकमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी देवीला शस्रांचा वापर करण्याची वेळ येऊ नये, असे साकडे घातले. 


आज विजयादशमी (VIjayadashami). संस्कृती परंपरेनुसार विजयादशमीच्या दिवशी शस्त्र पूजा करण्याची प्रथा असते तर आज विजयादशमीच्या निमित्ताने दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पोलीस मुख्यालयात पोलिस आयुक्त जयंत नाईक नवरे यांच्या हस्ते शस्त्र पूजा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस नेहमीच तत्पर असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी गुन्हे करतांना अनोखी शक्कल लढवत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने पोलिसांसमोर हे एक मोठं आव्हान उभं ठाकल असून पोलीस दलाचाही आधुनिकतेकडे प्रवास सुरु झाला आहे. 


आज झालेल्या शस्रपूजनात पारंपरिक आणि आधुनिक शस्रांचं पूजन करण्यात येऊन या शस्रांचा वापर करण्याची वेळ येऊ नये, शांतता कायम रहावी अशीच प्रार्थना करण्यात आली आहे. यावेळी पोलीस आयुक्तांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना दसऱ्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. शस्त्र पूजनात एके 47, रायफल, पिस्टल, काडतुसे, एअर गन, जिलेटीन यांसह पोलीस दलातील इतर शस्त्रांचा समावेश होता. दरवर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार विभागात (Arsenal Division) शस्त्रास्त्रांचे पूजन केले जाते. नाशिक पोलिसांनी यानिमित्त आज शस्त्रांचे विधीवत पूजन केले.


दरम्यान आज सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात नऊ दिवसांपासून नवरात्री साजरी होत आहे. तर आज दहाव्या दिवशी सर्वत्र विजयादशमी म्हणजेच दशहरा साजरा करण्यात येत आहे. यावेळी आज पोलीस आयुक्त कार्यालयात नाशिक पोलिसांनी एकत्र येत आरती केली. यावेळी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे शस्त्रांना झेंडूची फुले वाहून आरती केली. याप्रसंगी पुरोहितांनी मंत्रोच्चार करत शंखनाद केला. यावेळी पोलीस आयुक्तांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


दसऱ्याला विधिवत पूजा 
दसऱ्याच्या दिवशी भारतभर विधिवत पूजा केली जाते. अनेकजण वाहने खरेदी करतात. अनेकजण घरातील महत्वाच्या वस्तू, व्यावसायीक आपली दुकाने, अनेकजण पुस्तके, काम करत असलेल्या वस्तू यांची विधीवत पूजा केली जाते. तसेच पोलीस, लष्करी प्रशासन यांच्याकडून शस्रांचे पूजन केले जाते. यामध्ये रायफल, पिस्तूल आदींसह पोलीस प्रशासनानात वापरल्या जाणाऱ्या शस्रांचे विधिवत पूजन केले जाते.