Nashik Warkari Dindi : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) विरोधात राज्यभरात वारकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. याचे पडसाद नाशिकमध्ये देखील उमटले असून साधू संतांबद्दल अपमानजनक शब्द वापरल्याचा आरोप करत वारकऱ्यांनी नाशिकमध्ये (Nashik) दिंडी यात्रा काढली आहे. सुषमा अंधारे यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्याची मागणी दिंडीतील (dindi) वारकर्यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे. त्यात सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवता आणि साधु-संताबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहे. त्यामुळे वारकरी महामंडळ अंधांरेविरुद्ध आक्रमक झाला आहे. राज्यभरातून वारकरी संप्रदाय निषेद आंदोलने (Protest) केली जात आहेत. आळंदीमध्ये तर प्रेतयात्रा काढून वारकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वारकऱ्यांनी एकत्र येत दिंडी यात्रेचे आयोजन केले होते. या दिंडीच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यात येत आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरापासून युवा यात्रेला प्रारंभ झाला असून गोदावरी पटांगणावर रामकुंडानजीक या यात्रेचा समारोप होणार आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक वक्तव्य हे केलं होतं. यात साधू संतांचा अपमान केल्याचा आरोप वारकऱ्यांकडून केला जात आहे. यामुळे नाशिकमध्ये काळाराम मंदिर ते रामकुंडापर्यंत निषेध दिंडी काढण्यात आली. सुषमा अंधारे यांनी वारकरी संतांबद्दल आणि हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्य विधान केले असून वारकरी संतांचा अपमान केल्याचे दिंडीतील वारकरी म्हणाले. राज्यात वारकरी त्यांचा निषेध करत आहोत, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेला विनंती आहे, उद्धव साहेबांना विनंती आहे, तात्काळ काळ सुषमा अंधारे यांना पक्षातून काढा, अन्यथा उद्धव ठाकरे यांचा देखील निषेध करण्यात येईल , असा इशारा यावेळी वारकऱ्यांकडून देण्यात आला.
दिंडीतील वारकरी म्हणाले, सुषमा अंधारेवर वारकरी संप्रदायाकडून प्रचंड संताप महाराष्ट्रातून व्यक्त करण्यात करण्यात येत आहे. ज्या पद्धतीने अंधारे यांनी वक्तव्य केले आहे, त्यास कुठल्याही प्रकारचा आधार नाही. त्यामुळे त्यांचा जाहीरपणे निषेध करतो आहोत, यानंतर हि दिंडी थेट पंचवटी पोलीस स्टेशनला रवाना होऊन वारकरी पंचवटी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहेत. दरम्यान दिंडी क्षमताच करता पंचवटी पोलीस स्टेशनला वारकरी तक्रार देणार असून सुषमा अंधारेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिंडीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांनी संतांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झालेला आहे. नाशिकमध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आलं असून पोलिसांमध्ये तक्रार देखील दिली जाणार आहे.