Nashik Smart City : गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या (Smart City) कामांना नाशिककरांचा तीव्र नाराजी आहे. सद्यस्थिती गोदाकाठावर (Godavari) सुशोभीकरणाच्या कामांना नाशिककरांनी तीव्र विरोध केला जात असून शुक्रवारी सत्याग्रह आंदोलन (Protest) छेडण्याचा इशारा गोदा संवर्धन समितीच्या वतीने देण्यात आला आहे.


नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) स्मार्ट सिटीच्या वतीने शहरात विविध कामे केली जात आहे. दोन वर्षांपासून स्मार्ट सिटीचे काम सुरु असल्याने अनेक भागातील रस्ते खाेदले आहेत. यामुळे नागरिकांच्या वाहतुकीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गाेदावरीच्या घाट परसिरात सुशाेभीकरण सुरु आहे. या ठिकाणी पुरातन पायऱ्या तोडण्यात येऊन फरशा बसविल्या जात आहेत. मात्र सुशोभीकरणाच्या नावाखाली गाेदेचा इतिहासच पुसण्याचे काम केले जात असल्याचा आरोप नाशिककरांनी केला आहे.


दरम्यान गोदा घाटावर सुशोभीकरणाच्या सुरू असलेल्या कामांमुळे छोट्या मंदिरांना (Temple) तडे जात असल्याचे समोर आले आहे. शिवाय देवांच्या मूर्ती भग्न होत आहेत. यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी न घेता सुरू असलेली कामे थांबवा अशी मागणी नाशिककर करत आहेत. अनेक महिन्यांपासून स्मार्ट सिटीची काम नाशिकच्या गोदा घाटावर सुरू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गोदा घाट सुशोभीकरण हे महत्त्वाचं काम हाती घेण्यात आले आहे. गोदाकाठावरील जुने बांधकाम तोडून तिथे नवीन बांधकाम उभं केलं जातं आहे. पुरातन पायऱ्या काढण्याचे काम केले जात आहे. मात्र हे काम सुरु असताना परिसरातील इतर मंदिरांना तडे जात असल्याचे दिसून येत आहार. अनेक गोदाकाठावरची छोटी मोठी मंदिर होती,काही त्या मंदिरांना हादरे बसलेले आहेत. 


त्यामुळे इथल्या नाशिककरांची (Nashik) गोदा प्रेमींची मागणी होती की शेकडो वर्षापूर्वीच्या मंदिराची दुरुस्ती करून नंतर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात यावे. मात्र पुरातन पायऱ्या या भक्कम असल्याने त्या मशीनच्या साहाय्याने तोडतांना परिसरातील मंदिराना तडे जात आहेत. त्याचबरोबर मंदिरातील मूर्तीना देखील हानी पोहचत असल्याचे देवांग जानी यांनी सांगितले. जानी पुढे म्हणाले कि, पावणे तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत असून येथील पुरातन काळापासून असलेल्या सांडव्यावरच्या देवीचं मंदिर आहे. मात्र काम सुरु असताना हा सांडवा गायब केल्याचा प्रताप स्मार्ट सिटीने केला आहे. येथील अनेक मंदिरे ही नॅशनल मोनुमेंट्स म्हणून सुरक्षित आहेत. या मंदिराच्या तीनशे मीटरच्या रेडियसमध्ये कुठल्याही प्रकारची कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज आपल्याला करता येत नाही. विथ प्राइड परमिशन आणि ते डायरेक्टर रँकिंगच्या अधिकाऱ्यांच्या मार्फतच्या परवानगी घेतल्यानंतर सुद्धा, मात्र तसं काही होताना दिसत नसल्याचे जानी यांनी सांगितले. 


जानी पुढे म्हणाले कि, स्मार्ट सिटीने मंदिरे बांधून द्यावी, पायऱ्या बांधून द्याव्यात, स्मार्ट सिटीच्या समितीवर मनपा, पोलीस प्रशासन असून त्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या सर्वांनी हस्तक्षेप करून लवकरात लवकर ते काम आता थांबवलं पाहिजे. जर काम थांबले नाही तर आम्ही येत्या शुक्रवारी मोठा सत्याग्रह उभारणार आहोत, या आंदोलनाद्वारे प्रत्येक कामाच्या ठिकाणी जाऊन स्मार्ट सिटीच काम एक्सपोज करणार असल्याचे ते म्हणाले. एकूणच स्मार्ट सिटीच्या कामांबाबत नाशिककरांच्या भावना तीव्र होत आहेत, त्यामुळे मनपा प्रशासनाने तातडीने मंदिरांना तडे जात असल्याच्या बाबीकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.