Nashik Protest Karnataka : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा (Karnataka Maharashtra Dispute) वादाचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायाला मिळत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी या मुद्द्यावरून आंदोलन (Protest) केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) स्वराज्य संघटना आक्रमक (Swarajya Sanghatana) झाली असून नाशिकमध्ये असलेल्या कर्नाटक बँकेच्या समोर आंदोलन करण्यात आले आहे. शिवाय कर्नाटक बँकेच्या बोर्डाला काळे फासले आहे. 


कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादावरून तणावाचे वातावरण आहे. दरम्यान काल बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या (Kannad Rakshan Vedike) कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. तयामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच चिघळला असून हे लोन नाशिकपर्यंत पोहचले आहे. नाशिक शहरातील कर्नाटक बँक (Karnataka Bank) समोर स्वराज्य संघटनेने तीव्र आंदोलन छेडले असून बँकेच्या बोर्डाला काळं फासण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण तापले असून नाशिकमध्ये आणखी भागात आंदोलन होण्याची शक्यता आहे. 


नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या कर्नाटक बँकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी तीव्र शब्दांत कर्नाटक सरकारसह कन्नड रक्षण वेदिके या संघटनेचा समाचार घेतला आहे. यावेळी आंदोलनकर्ते करण गायकर म्हणाले, कर्नाटक सीमेवर शिवाजी महाराजांचे फोटो असलेल्या गाड्यांवर दगडफेक केली. त्या फोडण्यात आल्या. नाशिक शहरात राहत असलेल्या कर्नाटक बांधवाना सुद्धा जशास तसे उत्तर देऊ, एवढी मस्ती जर आली असेल तर हे विसरू नका, कि छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकवर सुद्धा फडकवलाय, हे सगळं थांबवलं नाही तर कर्नाटकची एक सुद्धा गाडी या महाराष्ट्रातून परत जाणार नाही, त्यामुळे महाराष्ट्राच्या  नादाला लागू नका, असा इशारा स्वराज्य संघटनेच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना देण्यात आला आहे. 


तीव्र आंदोलन करणार.. 
यावेळी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यानी कर्नाटक बँकेसमोर येत आंदोलन सुरु केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बँकेच्या बोर्डाला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार, महराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलन कर्ते भगवे झेंडे घेऊन, काळे कपडे परिधान करून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. जर कर्नाटक येथील संघटनाने आपली दडपशाही थांबवली नाही तर आंदोलन अधिकधिक तीव्र करण्याचा इशारा स्वराज्य संघटनाकडून देण्यात आला आहे.