एक्स्प्लोर

Nashik Crime : नाशिकमध्ये लाचखोर प्रवृत्ती वाढली, पोलिसांसह अधिकारी टॉपवर, नांदगावच्या लाचखोर तलाठ्यास अटक ! 

Nashik Crime : जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी पाच हजार लाचेची (Bribe) मागणी करणाऱ्या नांदगाव (Nandgoan) येथील तलाठी युवराज मासोळे यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Nashik Crime : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पोलिसांसह इतर अधिकाऱ्यांची लाचखोर वृत्ती काही केल्या कमी होताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी वडनेर भैरव येथील दोन पोलीस शिपायांना लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता एका तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 

जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी पाच हजार लाचेची (Bribe) मागणी करणाऱ्या नांदगाव (Nandgoan) येथील तलाठी युवराज मासोळे यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकड्याने महसूल विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी नांदगाव येथील तलाठी युवराज रामदास मासोळे यांच्या कडे जमिन जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तलाठी मासोळे यांनी सदर सातबारा उताऱ्यावर तक्रारदारांचे नाव लावण्याच्या मोबदल्यात 5000 रुपयांची मागणी केली असता दोन हजार रूपये आगाऊ म्हणून देण्याचे ठरले असता तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. 

त्यानुसार सोमवार (दि. 13) रोजी दुपारी तीन वाजता जुन्या तहसील कार्यालयातील तलाठी कार्यालयात नाशिक येथील पथकाने सापळा रचून तलाठी मासोळे यांना 2000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र पवार, पोलीस हवालदार प्रकाश डोंगरे, पो.ना. प्रणय इंगळे सहभागी झाले होते. दरम्यान, यापूर्वी देखील काही महिन्यांपूर्वी महसूल विभागातील तलाठ्यास सापळा रचून यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.

दरम्यान मागील काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लाचखोरीच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे चर्चेत आले आहे. मागील दोन वर्षांत मालेगाव विभागात लाचखोर तीन वरिष्ठ कर्मचारी आणि आठ कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. नाशिकच्या ग्रामीण पोलिसांत वाढती लाचखोर प्रवृत्ती पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन करणारी ठरत आहे. 
 
'सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय' चा विसर 
एकीकडे पोलीस प्रशासनाचे ब्रीदवाक्य असलेले 'सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय' या लाचखोर प्रवृत्तीमुळे कुठेतरी फोल टहार्ट असल्याचे दिसत आहे. या ब्रिदवाक्याचा अर्थ असा कि सामान्य जनतेची सुरक्षा आणि गैर वर्तन करणाऱ्यांना चाप लावणे होय. मात्र या ब्रिदवाक्याचा विसर पोलिसांना पडला कि काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Digital Arrest Case : धक्कादायक... नाशिकमधील एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला 20 दिवस डिजीटल अरेस्ट, 71 लाखांची लूट ...
नाशिकमधील एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला 20 दिवस डिजीटल अरेस्ट, 71 लाखांची लूट ...
एका बाजूला दुष्काळ, दुसऱ्या बाजूला पिकांना कवडीमोलाचा दर, राज्यातील टॉमॅटो उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात 
एका बाजूला दुष्काळ, दुसऱ्या बाजूला पिकांना कवडीमोलाचा दर, राज्यातील टॉमॅटो उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात 
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
मालेगावात भीषण अपघातात दुचाकीवरील महिला ठार; चिमुकल्यालाही दुखापत, रिक्षातून रुग्णालयात
मालेगावात भीषण अपघातात दुचाकीवरील महिला ठार; चिमुकल्यालाही दुखापत, रिक्षातून रुग्णालयात

व्हिडीओ

Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
Satara Crime news: महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
Dombivli Crime: कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
Embed widget