Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात मोटारसायकल चोरीचे (Two Wheelar Theft) प्रमाण अत्यंत वाढले आहे. रात्री तर चोरी होतेच मात्र आता दिवसा ढवळ्या देखील पार्क केलेल्या दुचाकी चोरटे लंपास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. 


नाशिक शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण अत्यंत वाढले आहे. रात्री तर चोरी होतेच मात्र आता दिवसा ढवळ्या देखील पार्क केलेल्या दुचाकी चोरटे लंपास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान अजय पासवान यांच्या सोसायटीच्या पार्कींगमधून अज्ञात चोरटयाने दुचाकी चोरून नेण्याची घटना घडली. या संदर्भात पासवान यांनी फिर्याद दिल्यानंतर देवळाली कॅम्प पोलिसांत (Deolali Police) गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दरम्यान यामागील काही चोरीच्या घटनांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास कुणाल विजय लहांगे याने साथीदारांसह चोरी केल्यााची गोपनिय माहिती मिळाली. 


त्यानुसार नाशिक गुन्हेशाखा युनिट क्र.02 पथकासह सरकारी व खासगी वाहनाने रवाना होऊन विशेष मोहिम हाती घेऊन गुप्त बातमीदार नेमून घटनास्थळाकडे रवाना झाले. देवळाली कॅम्प परिसरातील संसारी गाव परिसरात सापळा रचून कुणाल लहांगे यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने मागील एक महिन्यात दोन वेळा संसारीगाव परिसरातुन दुचाकी चोरल्याचे सांगितले. सखोल चौकशी केली असता सुरवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी इतर साथीदारांची नावे घेतली.यामध्ये साथीदार वेदांत बच्छाव व प्रेम पाईकराव हे देखील चोरीच्या कटात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
संशयित लहांगे याने सांगितल्याप्रमाणे एक पथक साथीदारांच्या मागावर गेले. साक्री, धुळे येथे जावून तपास करता वेदांत चंद्रकात बच्छाव संबंधित दुचाकीवर मिळून आला. तर चोरीची मोटरसायकल ही साक्री येथील त्याचा मित्र उत्कर्श चौधरी यास विकल्याचे समोर आले. उत्कर्ष चौधरी याचा शोध घेऊन त्याच्याकडून विनानंबरप्लेट दुचाकी ताब्यात घेतली. या दोघांकडून जवळपास ०२ लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कार्यवाही करीता देवळाली कॅम्प पो.स्टे कडे वर्ग केले आहे.  सदरची कार्यवाही नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, सहा. पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक आनन्दा वाघ, पोहवा गुलाब सोनार, नंदकुमार नांदुर्डीकर, राजेंद्र घुमरे, अनिल लोंढे व चापोहवा संतोश ठाकूर यांनी केलेली आहे.