Minister Dr. Bharti Pawar : प्रसाद योजनेच्या (Prasad Yojna) माध्यमातून त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरात विकासकामे होत आहेत, अनेक भागात प्रसाद योजनेतील कामांचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र या फलकांवर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो नसल्याने मंत्री डॉ. भारती पवार (MInister Dr Bharti Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक (Nashik) शहराजवळील जोतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर शहरात आज डॉ. भारती पवार यांनी भेट देत आरोग्य सुविधांसह इतर विकासकामांचा आढावा घेतला. तसेच विविध योजनांच्या संदर्भात संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आराखड्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवश्यक निर्देश देण्यात आले. यावेळी त्यांनी शहरात भेट दिल्यानंतर प्रसाद योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. मात्र प्रसाद योजनेच्या कामासंदर्भात लावण्यात आलेल्या बॅनर्सवर पंतप्रधान मोदी यांचा फोटोच नसल्याचे त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आढावा बैठकीत त्या म्हणाल्या कि, पंतप्रधान मोदी यांच्या सर्वसामान्यांसाठी 47 योजना असून त्याबाबत जनतेपर्यंत किती पोहोचल्या? सरकारी रुग्णालयात 260 पेक्षा अधिक औषधे उपलब्ध असताना ती गरजूंना मिळतात का असा सवाल करीत आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सरकारी यंत्रणांची झाडझडती घेतली. यावेळी पाहणी करत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनानंतर डॉ.भारती पवार देवस्थान ट्रस्टच्या कार्यालय इमारतीत त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.
दिरंगाई केल्यास कारवाई करणार
मंत्री पवार यांनी आढावा घेतला अधिकाऱ्यांना कामकाजात दिरंगाई केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी म्हणाल्या, पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी 47 योजना सुरू केले आहे. त्यातील किती योजना जनतेपर्यंत पोहोचल्या असा सवाल केला. सरकारी रुग्णालयातील औषधे गरजूंना मिळतात का याचाही आढावा घेतला. शहरा अभियंता अभिजीत इनामदार यांनी माहिती दिली. मात्र डॉ. पवार यांचे समाधान झाले नाही. त्यांनी शहरात जंतुनाशकांची फवारणी होती की नाही. याबाबत विचारणा केली आणि मिळालेले उत्तरावर नाराजी व्यक्त केली. यानंतर त्यांनी आरोग्य यंत्रणेची जिल्हास्तरीय अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांनी तसेच वैद्यकीय अधीक्षक यांना सूचना केल्या आणि त्यात सुधारणा झाल्या नाही तर कारवाईची करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी मंत्री पवार यांनी दिला.
फलकावरून मोदींचा फोटो गायब
त्र्यंबकेश्वर केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेची अनेक कामे सुरू आहेत त्याचे मोठे मोठे फलक गावभर लावण्यात आले आहेत खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून असे फलक सर्वत्र दिसतात मात्र त्यावर पंतप्रधान मोदी यांचे नाव अथवा फोटो का नाही असा सवाल डॉक्टर पवार यांनी उपस्थित केला केंद्रशासनाने त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासासाठी कोठेवती रुपये उपलब्ध करून दिले देशभरातील केवळ आठ तीर्थक्षेत्रांचा प्रसाद योजनेत समावेश केला त्यात त्र्यंबकेश्वर आहे. मात्र येथे पंतप्रधान मोदी यांच्या नावाचा उल्लेख हा फोटो का लावण्यात आला नाही असा सवाल यांनी उपस्थित केला.