Nashik Pani Puri : अनेक जणांना हातपाय असूनही अनेकदा बिकट परिस्थितीसमोर हातपाय लुळे पडतात. मात्र लाख संकट डोळ्यासमोर असली तरी नेटाने सामना करून परिस्थितीला आपल्यापुढं झुकायला भाग पाडणारे देखील अनेकजण जिद्दीनं उभं राहतात. नाशिकमधील (Nashik) असेच एक जोडपे सध्या अनेकांचे प्रेरणास्थान बनत आहे. दिव्यांगत्वावर मात करून हे जोडपे नाशिककरांना भुरळ घालणारी पाणी पुरी (Panni Puri) खाऊ घालत आहे. 


असं म्हटलं जात कि, उम्मीद पे दुनिया कायम है' याच म्हणीला प्रत्यक्षात साकारण्याचे धाडस या दोन्ही दिव्यांग (Disabled) पती पत्नीने केले आहे. दिव्यांगांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन अजूनही दुय्यम आहे. काम करता येत नसल्याने दिव्यांग व्यक्ती एकतर घरी बसून राहतात. अथवा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भीक मागतात. परंतु, कोरोना काळात शिक्षकाची नोकरी सुटल्याने परिस्थितीशी दोन हात करत नाशिकच्या गजबजलेल्या परिसर असलेल्या जत्रा हॉटेल (Jatra Hotel) जवळ पाणी पुरीचा स्टॉल उभा केला. आणि आज परिसरासह नाशिक शहरातून अनेक जण पाणी पुरीचा आस्वाद घेण्यासाठी येथे जात असतात. 


नाशिकच्या जत्रा हॉटेल परिसरात किशोर कडेकर (Kishor Kadekar) यांचे कुटुंबीय राहते. किशोर यांना जन्मापासून बोलता, ऐकता येत नसल्याने त्यांचे शिक्षणही यायचं माध्यमातून झाले. पुढे त्यांनी राहत असलेल्या ठिकाणी कपडे इस्त्रीचा व्यवसाय सुरु केला. याच सुमारास त्यांना मुंबईत (Mumbai) दिव्यांग शाळेत शिक्षकाची नोकरी लागली. यामुळे कडेकर कुटुंब मुंबईला स्थायिक झाले. शिक्षकांच्या नोकरीतून घर संसार चांगला सुरु होता. अशातच कोरोनाने जगभरात शिरकाव केला. आणि किशोर यांना नोकरी सोडावी लागली. त्यानंतर ते कुटुंबासह पुन्हा नाशिकमध्ये आले. कोरोनाचे वातावरण असताना नोकरी नाही, व्यवसाय नाही. सर्वच डबघाईला आल्याने संसाराचा गाडा कसाबसा चालू होता. 


अशातच वर्षभरानंतर कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होण्यास सुरवात झाली. निर्बध काही अंशी शिथिल झाले. म्हणजेच २०२० च्या सुमारास कडेकर कुटुंबीयांनी उदरनिर्वाहासाठी पाणीपुरी व्यवसाय करण्याचे ठरविले. पत्नी मनीषा कडेकर यांनी देखील किशोर यांच्या कल्पनेला दाद दिली. त्यानंतर जत्रा हॉटेल परिसरात पाणी पुरीचा गाडा उभा केला. मात्र महिना दोन महिने होत नाही तोच कोरोनाची दुसऱ्या लाटेने थैमान घातले. यामुळे जॅम बसलेला व्यवसाय मोडकळीस आला. शेवटी कडेकर कुटुंबाला पुन्हा घरी बसावे लागले. मात्र त्यानंतर कडेकर कुटुंबाला स्टॉल उभारण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागली. अखेर 2021 मध्ये तो दिवस उजाडला. 


किशोर पाणी पुरी सेंटर 
किशोर कडेकर हे आपल्या पत्नीसह सध्या किशोर पाणी पुरी सेंटर चालवितात. विशेष म्हणजे दोघेही मूकबधिर असूनही त्यांनी आपला ग्राहकवर्ग जोपासला आहे. हे जोडपे हाताच्या जेश्चरद्वारे ग्राहकांना काय हवे नको ते विचारात असते. जोडपे मूकबधिर असल्याने सुरवातीला लोकांना समजावण्यात अधिक वेळ वाया जात असायचा. त्यावेळी त्यांचा मुलगा अनेकवेळा ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी असायचा, मात्र आता परिसरातील नागरिकांनी कडेकर कुटुंबियांशी संवाद साधण्याची जणू सवयच झाली आहे. त्यामुळे या दोघांचा देखील जम बसत गेला आहे. एकूणच अनेकजण हातपाय सगळं काही व्यवस्थित असताना नैराश्यात जाऊन टोकाचे पाऊल उचलतात. मात्र या दोघांनी दिव्यांगांवर मात करत नवा संसार उभा केल्याने नवा आदर्श निर्माण केला आहे. 


ऑर्डर कशी दिली जाते? 
नाशिकच्या जत्रा हॉटेल परिसरात किशोर पाणी पुरी सेंटर नावाचा स्टॉल उभा करण्यात आला आहे. यामध्ये पाणी पुरी भेळपुरी, रगडा पॅटिस सह इतर पदार्थ तयार केले जातात. हे सर्व पदार्थाला लागणारे साहित्य हे कडेकर कुटुंब स्वतः घरी बनवितात. शिवाय नवख्या ग्राहकांसाठी संवाद साधण्यासाठी किंवा ऑर्डर देण्यासाठी विशेष पद्धतीचे मेनूकार्ड तयार करण्यात आले आहे. त्यावर बोट ठेवून ऑर्डर दिली जाते. शिवाय रेगुलर ग्राहकांसाठी सवयीचे झाले असल्याने जोडप्याच्या हातवाऱ्यावरून लगेचच लक्षात येते कि, नेमका संवाद काय चाललाय? सद्यस्थितीत रेगुलर ग्राहक वाढले आहे. मागील काही दिवसांत तर अनेक स्ट्रीट फूड नावाने ब्लॉग चालविणाऱ्या लोकांनी सोशल मीडियावर विडिओ पोस्ट केले आहेत. अल्पावधीतच या व्हिडीओना चागंली पसंती मिळत आहे.