Chhagan Bhujbal : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmers) आपला पिकवलेला शेतमाल विक्री करण्यासाठी बाजारपेठांचे (Market) जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. यावेळी भुजबळांनी अंदरसुल उपबाजारात मका व भुसार धान्य लिलावाचा (Grain Auction)  शुभारंभ केला. 


छगन भुजबळ यांच्या हस्ते आज कृषी उत्पन्न बाजार समिती (Bajar Samiti Andarsul) अंदरसुल उपबाजार येथे मका व भुसार मालाच्या लिलावास शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांनी स्वतः शेतमालाच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात 60 टक्क्यांहून अधिक लोक शेती करत आहे. देशात कृषी क्षेत्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठी क्रांती झाली. त्यातून देश मोठ्या प्रमाणात शेतमाल निर्यात करत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला मार्केट उपलब्ध होण्यासाठी मार्केटच विकेंद्रीकरण करणे अतिशय महत्वाचे असून तालुक्यात उपबाजार सुरू करण्यात आले आहे. त्यातून शेतकऱ्यांना अधिक फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. 


अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. अद्याप मात्र शेतकऱ्यांना शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात मदत उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अभ्यास करूनच भविष्यात आपल्या हिताची जोपासना करणारे कोण आहे याबाबत आपला निर्णय घेण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले. राज्यात अनेक कामांना स्थगिती देण्यात आलेली होती. त्यापैकी अद्यापही अनेक कामांची स्थगिती कायम आहे. त्यामुळे विकासाची कामे रखडली आहे. त्यामुळे काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे. मात्र सर्व कामे आपण पूर्ण करू असे त्यांनी यावेळी सांगितले. 


मका धान्य लिलावाचा शुभारंभ 
येवला मुख्य आवारासह उपबाजार अंदरसुल व पाटोदा येथे मका व भुसार धान्य लिलाव सुरु झाल्यामुळे अंदरसुल व पाटोदा गावांतील व परिसरातील शेतक-यांची जवळच्या ठिकाणी मका व भुसारधान्य विक्रीची चांगली सोय झाली आहे. उपबाजार अंदरसूलच्या मुख्य आवारात सोयाबीनला 5600 इतका उच्चतम भाव मिळाला. तर मक्यास 2211 रुपये भाव मिळाला. तसेच शेतीमालाचे रोख पेमेंट मिळत असुन शिवार व खेडा खरेदीतुन होणारी वजनातील फसवणुक टाळली जात आहे. तसेच आठवडयातुन सोमवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवार, शनिवार असे पाच दिवस लिलाव चालु असल्याने अंदरसुल व पाटोदा परिसरातील शेतकरी बांधवांनी आपला मका व इतर भुसारधान्य वाळवुन व स्वच्छ करु न विक्रीस आणावे. कुणीही खेडोपाडी खरेदी करणाऱ्या खाजगी व्यापाऱ्यांना भाव भरुन मकाची विक्री करु नये. कारण वजनात तसेच बाजारभावात व पेमेंटबाबत फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे आवाहन करण्यात येत आहे.