Nashik Sinnar Crime : नाशिकच्या (Nashik) सिन्नर शहरातून एक धक्कादायक माहिती समोर येत असून महिलेच्या कौटुंबिक असहाय्यतेचा फायदा घेत तिला धर्मांतराचे आमिष दाखवत महिनाभर घरात कोंडून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फादरसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
नाशिकसह जिल्हाभरात महिला अत्याचाराच्या (Molestation) घटना दिवसेंदिवस वाढ होत असून सिन्नर (Sinnar) शहरात अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत अहमदनगर जिल्ह्यातील 35 वर्षे महिला रोजगारासाठी पतीसमवेत मालेगाव एमआयडीसी परिसरात वास्तव्यास होती. या महिलेला काम देण्याच्या बहाण्याने शहर परिसरात नेत तिला एका घरात महिनाभर डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर महिलेला धर्मांतर करण्याचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला आहे. याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी (Sinnar Police) फादरसह पाच जणांविरोधात पुन्हा दाखल करत अटक केली आहे. या संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला धर्मांतराचे प्रलोभन दाखवत गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना 30 नोव्हेंबर 2022 ते 29 डिसेंबर 2022 या दरम्यान घडली असून सदर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. संगमनेर तालुक्यातील ही महिला माळेगाव औद्योगिक वसाहतीत मजुरी करून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. सिन्नर शहरातील वैदुवाडी जवळ राहणाऱ्या दोन महिलांनी या महिलेस काम लावून देतो असे सांगत तिला घरी नेले. या ठिकाणी तिला गुंगीचे औषध देऊन सदर ठिकाणी फादरसह दोन पुरुषांनी तिच्यावर महिनाभर तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिच्या मुलांना भीक मागण्यास भाग पाडले. या प्रकरणी महिलेने 4 फेब्रुवारीला सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला.
संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान या प्रकरणाचा सुगावा पोलिसांनी लागताच पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह सिन्नर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या चौघांना अटक केली. भाऊसाहेब ऊर्फ भावड्या यादव टोटके, कथित फादर राहुल लक्ष्मण आरणे, रेणुका ऊर्फ बड़ी यादव दोडके व प्रेरणा प्रकाश साळवे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या गुन्ह्यातील एक जण मात्र फरार आहे. अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसात दिली तक्रार ...
नगर जिल्ह्यातील महिला आपल्या पती व तीन मुलांसह रोजगार मिळविण्यासाठी सिन्नरच्या औद्योगिक वसाहतीत आली होती. 30 नोव्हेंबर रोजी सदर महिला माळेगाव येथून मुसळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार शोधण्यासाठी जात होती. रिक्षा थांब्यावर थांबली असता तिथे दोन महिला आल्या. त्यांनी तिची विचारपूस केली. आपण एमआयडीसीत जात असल्याचे सांगताच त्यांनी तू आमच्या सोबत चल, आम्ही तुला काम मिळवून देतो असे तिला सांगितले. त्यानंतर त्या शोधण्यासाठी महिला तिला त्यांच्या घरी येऊन गेल्या. त्यानंतर जवळपास महिनाभर तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.