Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर निवडणुकीतील (Nashik Padvidhar Election) राजकीय नाट्यानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या लढतीचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. नाशिकमध्ये आता 16 उमेदवार रिंगणामध्ये असून ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यामध्ये सरळ लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कुणाची कुठे ताकद आहे, हे लवकरच समोर येणार आहे. 


नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झालेला आहे. या निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. यात दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होईल. एक म्हणजे सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील. यातील शुभांगी पाटील याना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर झाला असून तांबे यांना येत्या एक दोन दिवसांत भाजपाचा पाठिंबा जाहीर होऊ शकतो. दुसरीकडे शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला आहे. महाविकास आघाडीचा जिल्ह्यात म्हणजेच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामधल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये प्राबल्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळालेल्या शुभांगी पाटील ज्यावेळेस निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरल्या. त्यावेळेसच ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली हे स्पष्ट झालेले आहे. 


सत्यजीत तांबे यांना भाजपचा पाठिंबा मिळणार?


तर दुसरीकडे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना देखील भाजपचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. कारण सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे हे तीन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी पूर्णपणे हा मतदार संघ बांधलेला आहे. लाखो मतदारांची नोंदणी देखील त्यांनी केलेली आहे. शिवाय नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांची साथ जर सत्यजीत तांबे यांना मिळाली तर त्यांचं पारडं हे जड होईल. सुरुवातीला नाशिक पदवीधर निवडणूक ही एकतर्फी वाटत होती मात्र आता कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजीत तांबे यांच्यातील जमेच्या बाजू कोणत्या आहेत? याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. 


निवडणूक जिंकणारच.... : शुभांगी पाटील


नाशिक पदवीधर मतदारसंघातील अनेक शिक्षक संघटनांशी चर्चा केलेली असून पाठिंबा मागितलेला आहे. सगळ्या शिक्षक संघटना पाठिंबा देतील, कारण की मी एक महिला शिक्षक उमेदवार असून गेल्या दहा वर्षापासून शिक्षकांचे अनेक प्रश्न, विनावेतन, पेन्शन, पदभरती असेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, अनेक हजारो प्रश्न सोडून सोडवले आहेत. याच लोकांच्या माध्यमातून पुढे आलेले आहे. त्यामुळे या सगळ्याच्या बळावर माझा उमेदवारी अर्ज कायम असून ही निवडणूक जिंकणारच असा आशावादही यावेळी उमेदवार शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला. 


दरम्यान नागपुरातही 22 उमेदवार रिंगणात असून भाजप समर्थित नागो गाणार यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या गोटातील एकूण तीन उमेदवार रिंगणात आहेत तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनी कपिल पाटील यांना विनंती करुनही शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे हे मैदानामध्ये आहेत. त्यामुळे जरी शिवसेनेच्या उमेदवारांना माघार घेतलेली असली तरी महाविकास आघाडी समोरचं संकट अजूनही टळलेले नाही.