Nashik Kanda Parishad : नाशिक (nashik) जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील (Niphad) रुई या गावात कांदा परिषदेचे (Kanda Parishad) आयोजन करण्यात आले आहे. उद्या रुई या गावात रयतचे सदाभाऊ खोत (sadabhau Khot), भाजप नेते किरीट सोमैय्या (Kirit Somaiyya), गोपीचंद पडळकर आदी नेत्याची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे हि कांदा परिषद चांगलीच रंगणार आहे. 


विशेष म्हणजे रुई या गावात सदाभाऊ खोत यांनी कांदा परिषद आयोजित करण्यामागे याच ठिकाणी झालेली कांदा परिषद होय. 1982 मध्ये शरद जोशींच्या नेत्तृत्वाखाली या ठिकाणी कांदा परिषद भरविण्यात आली होती. म्हणून सदाभाऊ खोत यांनी हे गाव निवडलं. मात्र तब्बल 39 वर्षांपूर्वी शरद जोशींनी कांदा परिषदेसाठी हे गाव का निवडलं असावं? असा प्रश्न आपसूक पडतो. 


शरद जोशी मूळचे साताऱ्याचे मात्र अनेकविध आंदोलने नाशकात केलेली. त्यावेळी निफाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडे त्यांचे येणे जाणे होते. अशातच त्यांचा निफाड परिसरातील शेतकऱ्यांशी संपर्क वाढत गेला. विशेषतः रुई या गावात त्यांचा चांगला मित्र वर्ग तयार झाला. अन जोशींना हे गाव हळहळू आवडू लागलं. दरम्यानच्या काळात कांद्यावरून रणकंदन माजले होते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलने केली. शरद जोशींनी शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संपर्क साधत एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी ते म्हणाले कि, आपल्याला कांदा प्रकरणाबाबत सरकारला जग करण्यासाठी ठोस काहीतरी करायला हवं. 


शरद जोशींनी शेतकऱ्यांना एकत्र आणलं. शेतकऱ्यांनाही शरद जोशींचे म्हणणे पटले. त्यानुसार 1982 ला कांदा परिषद आयोजित करण्याचे ठरले. त्यानुसार शेतकऱ्यांनी विविध गावांची नावे सुचवली. त्यानंतर मात्र रुई या गावात कांदा परिषद घेण्याचे निश्चित झाले. शरद जोशी यांनी या ठिकाणी कांदा परिषद घेत सरकारला जाब विचारला. मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी सरकारला धारेवर धरले. 


निफाड हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे केंद्र
निफाड हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे केंद्र म्हणून ओळखले जाते. निफाड तालुक्यातील रुई या गावात या परिषदेचे आयोजन करण्यात आले. मात्र काही वर्षांपूर्वी म्हणजेच 1982 ला याच गावात कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे शरद जोशी यांनी 1982 साली या गावात पहिली कांदा परिषद घेतली होती. यावेळी देखील शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचावा, कांद्याला अनुदान मिळावा, हमीभाव मिळावा आदी मागण्यासंदर्भात या परिषदेत विचार मंथन करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा त्याच रुई गावात रयत क्रांती संघटनेच्या वतीने येत्या 05 जुन रोजी कांदा परिषद आयोजित करण्यात आली आहे.