Nashik Leopard : नाशिक (Nashik) शहर परिसरात बिबट्याचा (Leopard) वावर काही नाही. यामुळे वनविभागाकडून देखील वेळोवेळी बिबट्यापासून बचावासाठी आवाहन करण्यात येते. दरम्यान नाशिकमधील मुक्त विद्यापीठाने (Open university) बिबट्याचा संचार कमी करण्यासाठी अथवा बिबट्याला विद्यापीठ परिसरातून दूर ठेवण्यासाठी अनोखी शक्कल वापरली आहे. विद्यापीठाच्या दीडशे एकर क्षेत्रात जवळपास दोनशेहून अधिक दिव्यांच्या उभारणीसह सेन्सर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. 


नाशिक शहर असो कि नाशिक जिल्ह्यातील निफाड (Niphad), सिन्नर (Sinnar) आदी परिसर असो, येथील नागरिकांना बिबट्याचे दिसणे नवे नाही. जिल्ह्यातील विविध भागात दिवसांतून चारदा बिबट्याचे दर्शन होत आहे. तर नाशिक शहरात अनेक भागात बिबटयाचा मुक्त संचार नागरिकांना दिसून येतो. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातही बिबट्याचे दर्शन झाल्याने कर्मचारी भयभीत झाले होते. यावर उपाय म्हणून विद्यापीठ प्रशासनाने दहा लाख रुपये खर्चून खास यंत्रणा उभी केली आहे. सौर उर्जेवर 210 लुकलुकणारे दिवे त्याचबरोबर अशा विशिष्ट ध्वनीची यंत्रणा बिबट्याला दूर ठेवण्यास महत्त्वाची भूमिका निभावत आहे. 


राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना मुक्त आणि दूरस्थ शिक्षण देण्यासाठी नाशिक शहराजवळील गंगापूर रोड परिसरात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कार्यरत आहे. जवळपास दीडशे एकराचा परिसर सलेल्या या भागात इमारतींसह झाडांनी बहरलेला आहे. शिवाय विद्यापैठला लागूनच गंगापूर धरणालगतचा हा परिसर आहे. यामुळे बिबट्याच्या अधिवासाला सोयीस्कर असे वातावरण असल्याने मागील काही महिन्यांपूर्वी बिबट्याचा संचार असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले होते. तर काही महिन्यांपूर्वीच रात्रीच्या वेळी बिबट्याने सुरक्षारक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली होती. आवारातील कुत्र्यांवर बिबट्याने अनेकदा हल्ले केले होते. त्याचबरोबर विद्यापीठ आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा मुक्त संचार वारंवार कैद झाला आहे. तसेच गंगापूरकडून विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्याने लहान मुलावर हल्ला केल्याचे समोर आले होते. दरम्यान याच पार्श्वभूमीवर भयग्रस्त वातावरणात वावरणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी विद्यापीठाने या अनोख्या प्रणालीची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. 


अशी काम करतेय यंत्रणा 
मुक्त विद्यापीठाच्या परिसरात ठराविक अंतरावर कमी उंचीवर एकूण 210 खांब उभारण्यात आले आहेत. सौरऊर्जेवरही प्रणाली काम करते सूर्य मावळला की स्वयंचलित पद्धतीने प्रणाली सुरू होते. प्रत्येक खांबावरील हिरवा आणि लाल रंगातील दिवे लुकलुकण्यास सुरुवात होते. त्यावरील ध्वनी क्षेपकातून दर दहा ते वीस सेकंदाच्या अंतराने विशिष्ट आवाज येतो. संपूर्ण दीडशे एकरच्या परिसरात रात्रभर लुकलुकणाऱ्या दिव्यांचा प्रकाश आणि आवाज सर्व भागात होतो. गडद रंगाचा प्रकारचा आणि आवाजाने परिसरात शांतता काही काळ असते. त्यामुळेच बिबट्या या आवाजापासून व दिव्यांपासून का होईना दूर होईन अशी प्रशासनाला खात्री आहे. त्यानुसार गेल्या महिनाभरात निरीक्षणानुसार बिबट्या निदर्शनास आला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले . त्याशिवाय परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला नसल्याने विद्यापीठ भयमुक्त असल्याचे प्रशासनाने सांगितले.