Nashik HIV Wedding : एकीकडे आजही एचआयव्ही बाधित (HIV Aids) म्हटलं कि समाजात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. मात्र त्यांनाही इतर माणसांसारखं मनसोक्त जगायचं आहे, जोडीदारासोबत आयुष्य फुलवायच आहे. या माध्यमातून नाशिकच्या (Nashik) काही संस्थांनी समाजात दृष्टीकोन बदलण्यासाठी पुढाकार घेत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. एचआयव्ही बाधितांचा वधुवर मेळावा आयोजित करून याद्वारे सात जोडप्यांची रेशीमगाठ बांधली आहे. 


एचआयव्ही सारख्या आजाराची झुंज देताना अनेक जण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जातात या रुग्णांना सामाजिक आणि मानसिक आधार मिळावा यासाठी वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यातून एचआयव्ही बाधित सात जोडपी विवाह बंधनात अडकणार अडकली. यासाठी नाशिकस्थित असलेल्या नाशिक नेटवर्क, प्रेम फाउंडेशन, जिव्हाळा संस्था तुळसाई संस्था, राष्ट्रसेवादल यांच्यातर्फे एचआयव्ही सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींचा वधू वर परिचय मेळावा नुकताच झाला. त्र्यंबक नाक्यावरील होली क्रॉस चर्चमध्ये झालेल्या मेळाव्यास एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या शेकडो वधू-वर आणि सहभाग नोंदवला या माध्यमातून सात विवाह देखील जुळून आले. यामुळे गेल्या काही वर्षांपासून मुख्य प्रवाहापासून हरवलेल्या या जोडप्यांना जीवन जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. 


दरम्यान मेळाव्यात विवाह जुळून आलेल्या एड्ससह जीवन जगणाऱ्या या सातही जोडप्यांचे विवाहपूर्व आणि विवाह पक्षात समुपदेशन केले जात आहे. यात नियमित औषधोपचार, नियमित आरोग्य तपासणी, लक्षणांवर आधारित उपचार पद्धती अवलंबनासाठी वैद्यकीय सल्ला आदींबाबत मार्गदर्शन केले जात आहे.  एचआयव्ही असलेली नागरिक ही सर्वसामान्य जीवन जगू शकतात. त्यांना एचआयव्ही ग्रस्त एचआयव्ही बाधित किंवा एचआयव्हीचे रुग्ण म्हटल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे समाजातून एकटे पाडल्याची भावनाही त्यांच्या तयार होते. या नागरिकांना एचआयव्हीग्रस्त ऐवजी एचआयव्ही सहजीवन जगणारी नागरिक म्हणावे असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले. 


आनंद पेरणारे नाशिक नेटवर्क
नेटवर्क विथ नाशिकतर्फे एचआयव्हीग्रस्तांच्या आयुष्यात आनंद पेरणारे उपक्रम राबविले जातात. त्याअंतर्गत एड्‌सग्रस्तांना वैवाहिक जीवन जगता यावे व त्यांना जोडीदार मिळावा, यासाठी रेशीमगाठ बांधण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या पाच वर्षांपासून ही चळवळ सुरू असून, एड्‌ससह जगणारे रुग्ण लग्नासाठी होकार देत आहेत. विशेष म्हणजे वधू-वर मेळाव्यातून काही विवाह जुळविले आहेत. एड्‌सग्रस्तांच्या आयुष्यातील एकटेपणा दूर करण्यासाठी विवाह हा सकारात्मक उपाय ठरू शकतो, या दृष्टीने संस्था काम करीत आहे. समाजात अशा जगणाऱ्या नागरिकांना देखील आयुष्यात रंग भरायचे असतात. त्यांनाही ऐन तीस पस्तिशीच्या आत अशा दुर्धर आजाराला सामोरे जावे लागते. मात्र जगण्याची उमेद मिळावी यासाठी नवा जोडीदारसोबत आयुष्य जगण्यासाठी ते देखील धडपडत असतात. अशा वधू-वर मेळाव्यातून काही विवाह जुळविले आहेत. एड्‌सग्रस्तांच्या आयुष्यातील एकटेपणा दूर करण्यासाठी विवाह हा सकारात्मक उपाय ठरू शकतो, या दृष्टीने संस्था काम करीत आहे.