Nashik Satyajeet Tambe : लवकरच जे मागचे दहा पंधरा दिवसांमध्ये राजकारण (Nashik Politics) झालं. ज्याच्यातून परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. मी तर अपक्ष उमेदवार आहे, अपक्षच राहील. याच्यापेक्षा जास्त कुठलेही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नसल्याचे वक्तव्य सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी केले आहे. 


आज नाशिक (Nashik) पदवीधरच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया सुरू आहे. याच दरम्यान सत्यजीत तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केले आहे. मी तर अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्ष राहील. याच्यापेक्षा जास्त कुठलेही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नाही. लवकरच जे मागचे दहा पंधरा दिवसांमध्ये राजकारण झालं. ज्याच्यातून परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. याच्यावर जे अर्धसत्य ठेवून ज्या पद्धतीने एकच बाजू मांडली गेली. त्यामुळेच मुद्दाम कुठली प्रतिक्रिया दिली नाही. कारण शब्दाने शब्द वाढू नये आपण ज्या पक्षांमध्ये आयुष्यभर राहिलो. त्या पक्षाला अजून लोकांसमोर वाईट करू नये, म्हणून खरं तर बोललो नाही. वेळ आल्यावर या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार असल्याचे तांबे म्हणाले. 


ते पुढे म्हणाले, एकंदरीतच या पाचही जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीचा ऋणानुबंध त्यांनी सामान्य जनतेशी इथल्या मतदारांशी तयार केला. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणूक एकतर्फी असून सगळ्याच राजकीय पक्षांचे असतील कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. ही सर्व मंडळी पक्षीय भेदाभेद विसरून सोबत आहे. त्याचं कारण म्हणजे, देखील निवडणुकीपुरतं फक्त राजकारण करत असतो. निवडणूक झाल्यानंतर परिवारानं नियम कायम पाळलेला आहे. आम्ही सातत्याने सामान्य लोकांच्या कामासाठी राबत असतो. कधी त्याच्यामध्ये पक्षीय भेदाभेद ठेवत नाही. त्यामुळे सर्व लोक जे आहेत. ते प्रेमाने मनापासून सोबत काम करताना आपल्याला दिसत आहेत. 100 पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिलेला असून टीडीएफ शिक्षक भारतीसह अनेक संघटना आहेत. 


नाशिक पदवीधर (Nashik Graduate Constituency) मतदारसंघातील लोकांचे प्रेम बघून मन भरून येतं आहे, शिवाय इतक्या प्रेमाने पाचही जिल्ह्यातील लोक पाठीशी उभे आहे. हा मतदारसंघ अतिशय मोठा मतदार संघ असून 54 तालुक्यांचा आहे. चार हजार पेक्षा जास्त गावांचा मतदारसंघ आहे. उत्तर महाराष्ट्र, खानदेशसह इतर भागातून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्या ऋणात राहणं पसंत करून येणाऱ्या काळामध्ये इथल्या लोकांचा विश्वास सार्थ करण्याचं काम करेल, असे आश्वासन यावेळी सत्यजीत तांबे यांनी दिले. 


सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार... 


आता फक्त उत्सुकता एवढीच आहे की, मताधिक्य किती होतं? मतदान किती जास्तीत जास्त होतं? त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. विविध क्षेत्रातले लोक माझ्या पाठीशी उभे राहिलेत आणि चांगला उमेदवार म्हणून लोक जर पाठीशी उभे राहत असतील आणि पक्ष राजकारणाच्या वर जाऊन जर ते माझ्या सोबत राहत असेल तर त्याच्यामध्ये आनंदच आहे. मी तर अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्ष राहील. याच्यापेक्षा जास्त कुठलेही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नाही. लवकरच जे मागचे दहा पंधरा दिवसांमध्ये राजकारण झालं. ज्याच्यातून परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. याच्यावर जे अर्धसत्य ठेवून ज्या पद्धतीने एकच बाजू मांडली गेली. त्यामुळेच मुद्दाम कुठली प्रतिक्रिया दिली नाही. कारण शब्दाने शब्द वाढू नये आपण ज्या पक्षांमध्ये आयुष्यभर राहिलो. त्या पक्षाला अजून लोकांसमोर वाईट करू नये, म्हणून खरं तर बोललो नाही. वेळ आल्यावर आम्ही या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार असल्याचे तांबे म्हणाले.