नाशिक: नाशिक पदवीधर मतदान प्रक्रियेला आज सकाळी आठपासून सुरुवात झाली आहे. दहा वाजेपर्यंत नाशिक विभागात जवळपास 6.52 टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच, जवळपास 17115 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
पहिल्या दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या घडामोडींमुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेत राहिली आहे. आठ वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. दरम्यान, मतदानाला शांतपणे सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत 6.52 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये 13 हजार 589 पुरुष मतदार तर 3526 महिला उमेदवारांनी मतदान केले आहे. नाशिक विभागात एकूण 2 लाख 62 हजार 731 मतदार असून त्यापैकी दोन तासांत 17 हजार मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातून 18 हजार 918 मतदारांपैकी 1158 मतदारांनी मतदान केले आहे. धुळे जिल्ह्यातून 23 हजार 412 उमेदवारांपैकी 1534 मतदारांनी मतदान केले आहे. जळगाव जिल्ह्यातून 35 हजार 58 उमेदवारांपैकी 2267 मतदारांनी मतदान केले आहे. नाशिक जिल्ह्यातून 69 हजार 652 उमेदवारांपैकी 3822 मतदारांनी मतदान केले आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातून 1 लाख 15 हजार 638 उमेदवारांपैकी 8334 मतदारांनी मागील दोन तासांत मतदान केले आहे.
दरम्यान, नाशिक विभागात सर्वाधिक मतदार अहमदनगर जिल्ह्यात आहेत. अहमदनगरमध्ये 1 लाख 15 हजार 638 मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात 69 हजार 652, जळगाव जिल्ह्यत 35 हजार 58, धुळे जिल्ह्यात 23 हजार 412, नंदूरबार जिल्ह्यात 18 हजार 971 इतके मतदार आहेत.
338 मतदान केंद्रावर मतदान सुरू
नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही संख्या जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्वाधिक मतदान केंद्र अहमदनगर जिल्ह्यात असून, तेथील मतदान केंद्रांची संख्या 147 इतकी आहे. नाशिकमध्ये 99, जळगाव जिल्ह्यात 40, धुळ्यात 29 आणि नंदूरबार जिल्ह्यात 24 मतदान केंद्रे आहेत. विभागात एकूण 338 मतदान केंद्रे आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. राज्यात सर्वात चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधरसह अमरावती तसेच नागपूर शिक्षक, मराठवाडा शिक्षक आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान होतंय. भाजपने जाहीर पाठिंबा दिलेला नसला तरी नाशकात सत्यजीत तांबेंच्या पाठीशी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते उभे राहिलेत. त्याचसोबत नागपुरातही भाजप समर्थित नागो गाणार, महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यात लढत होतीय. त्याचसोबत अमरावती, मराठवाडा आणि कोकण मतदारसंघातही मतदान होतंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :