MLC Election Nashik : पहिल्या फेरीची मतमोजणी अंतिम टप्प्यामध्ये आलेली असून हळूहळू सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आघाडी घेतल्याचं बघायला मिळते. त्यामुळे पहिल्या फेरीच्या अंतिम चित्र बघायचं झालं तर सत्यजित तांबे हे सध्या आघाडीवर असून अद्याप इथून पुढे चार फेऱ्या होणं बाकी असल्याचे प्रशासनकडून सांगण्यात आले आहे. 


नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत गेल्या तासाभरापासून (Nashik Graduate Constituency) पहिल्या फेरीतली मतमोजणी सुरू झाली आहे. सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यामध्ये या मतदारसंघातल्या लढतीनं उभा महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. दुपारी अडीचनंतर साधारण पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाली. या मतमोजणीमध्ये सत्यजित तांबे आघाडीवर असल्याचे चिन्ह दिसतं आहे. पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झालेली आहे. दीड तासापासून पहिल्या फेरीला सुरुवात झाल्यानंतर सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली आहे. सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील (Shubhangi Patil) अशी लढत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. 


पहिली फेरी सुरू होऊन दीड तास उलटून गेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे या दोघांमध्ये हा सामना रंगणार आहे. सुरुवातीच्या दीड तासांपासून जवळपास जवळपास मतमोजणी सुरू आहे. अशा स्वरूपाची काटे की टक्कर या दोघांमध्ये सुरू होती. मात्र आता पहिल्या फेरीची मतमोजणी ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली असून हळूहळू सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतल्याचं बघायला मिळते. त्यामुळे पहिल्या फेरीच्या अंतिम चित्र बघायचं झालं तर सत्यजित तांबे हे सध्या आघाडीवर असून अद्याप इथून पुढे चार फेऱ्या होणं बाकी आहे. त्यामुळे पुढे शुभांगी पाटील किती झपाट्याने पुढे येतात, मतदारांनी त्यांना किती पसंती दिली, हे थोड्याच वेळात समोर येईल. 


तसेच दुसरीकडे जर बघितलं तर अवैध मतांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचा बघायला मिळते. पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यातील पहिल्या काही मतपत्रिकांचा अंदाज घेतला असता सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. दरम्यान, यासोबतच बाद मतपत्रिकांची संख्या अधिक असल्याने आता कोटा किती निश्चित होतो? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोटा निश्चितीनंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे बाद मतांचा फटका नेमका कुठल्या उमेदवाराला बसणार हे पाहणं महत्वाचा ठरणार आहे.


निकाल उशिरापर्यंत लागण्याची शक्यता... 


सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही तासांमध्ये पहिल्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीला सर्व मतपेट्या एका सरमिसळ हौदात टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या वेगळ्या करण्यात येऊन जवळपास 28 टेबलांवर ठेवण्यात आल्या. जवळपास एक हजार मत पत्रिका त्या त्या टेबलावर ठेवण्यात आल्या. या पत्रिकांपैकी आता वीस वीसचे गठ्ठे केले जात आहेत. एक गठ्ठा पूर्ण झाल्यानंतर दुसरा गठ्ठा मतमोजणीसाठी काढण्यात येत आहे.  त्याचबरोबर वैध आणि अवैध मत कुठले आहेत. हे देखील पाहणं पाहिले जात आहे एक फेरी म्हणजेच पहिली फेरी पूर्ण होण्यासाठी जवळपास एक ते दीड तासांचा कालावधी हा लागत आहे. त्यामुळे नाशिक पदवीधरचा निकाल हा उशिरापर्यंत लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.