Nashik Sanjay Raut : पक्ष सोडल्यानंतर कधीच नारायण राणे (Narayan Rane) यांना भेटलेलो नाही. पक्ष सोडून गेलेल्या कोणत्याच माणसाचं तोंड बघत नाही. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना भेट घेणार आहेत, चांगली गोष्ट आहे, मात्र नारायण राणे यांचे केंद्रीय मंत्रिपद जातंय, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत (sanjay Raut) हे नाशिकमध्ये (Nashik) असताना पत्रकार परिषदेत नारायण राणे यांच्यावर तोंडसुख घेतले. राऊत यांनी आज थेट राणेंना अरेतुरे करत त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. कोण आहात तुम्ही? डरपोक माणूस, आमच्या नादाला लागलात तर आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ. आमचं आयुष्य रस्त्यावर गेलं. तू कधी रे कानफटात खाल्ली? मोठा भाईगिरी दाखवतो, आम्हाला. या दाखवतो, असं आव्हानच संजय राऊत यांनी नारायण राणे यांना दिलं. मंत्री नारायण राणे आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नारायण राणे यांनी सामनाच्या अग्रलेखाचा संदर्भ देत संजय राऊत यांना सोडणार नाही, म्हणत पुन्हा जेलमध्ये टाकण्याची भाषा केली होती, त्यावरून संजय राऊत यांनी राणे यांच्यावर हल्लाबोल करत एकेरी भाषा वापरत राणे यांना खुलं आव्हान दिलं होते. त्यानंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेत थेट मंत्री पद जाणार याबाबत बोलले आहेत.
संजय राऊत म्हणाले, माझ्या आयुष्यात मी पक्ष सोडल्यावर राणेंना भेटलो नाही. कधी बेईमान गद्दारांना भेटत नाही, त्यांचे तोंडही बघत नाही. राणेंना उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त झाली हे चांगलं लक्षण आहे. राणे यांनी सुरवात केली असुन आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे यांच्यावरती अत्यंत घाणेरड्या शब्दांमध्ये आरोप केले. पण आता नाही,. त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. लवकरच त्यांचं मंत्रीपदही जातंय, याला कारण खूप आहेत. आता महाराष्ट्रात एक नवा गट स्थापन झाला असून या गटातील माणसांना केंद्रावर जायचं असल्यास कोणाला तरी काढावा लागेल. त्यातच राणे यांचा परफॉर्मन्स शून्य असल्याचे ऐकले आहे. पीएमओकडे आमचीही माणसे आहेत, ते आम्हाला माहिती देत असतात. मात्र त्यात पडायचं नाही. तुम्ही आमच्यात पडायचं नाही. तुम्ही आहात ना, तुम्ही तुमच काम करा. तुम्ही ज्या पक्षात गेला, त्या पक्षाशी इमान राखण्याचा सल्ला राऊतांनी दिला.
संजय राऊत यांनी पुन्हा हल्लाबोल करत थेट नारायण राणे यांचे भविष्य सांगून टाकलं आहे. नारायण राणे यांच्या मंत्रीपदावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. बाडगा जास्त मोठ्या बांग देतो असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. तो सिलिंडर जास्त मोठं करतो. सध्या हे सिलिंडरवर करून बोलत आहेत. तुम्ही आमच्याविरोधात उभं राहिला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी संयम राखायला सांगितलं. उद्धव ठाकरे म्हणाले संयम राखा, मात्र तुम्ही आता मर्यादा सोडली आहे, त्यामुळे आता हात जोडलेले होते, ते सोडावे लागतील, पण अजुन सुटलेले नाहीततुम्ही आमची काय उखाडणार? दहा पक्ष बदलणारा माणूस असून त्याच्यामागे लागण्यात मला स्वारस्य नाही, आपण त्यात पडणारही नाही. आम्हाला डरपोकांना घाबरण्याचं कारण नाही, असा हल्लाही संजय राऊत यांनी चढवला.