Nashik Sanjay Raut : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला मुंबई महापालिका (Mumbai Mahapalika) परवानगी देणारच, कारण राज्यात सरकार त्यांचं आहे. ते सुद्धा भाजप पुरस्कृतच आहे सगळं, परवानगी आम्हाला मिळत नाही आम्हाला संघर्ष करावा लागतो, अशा शब्दांत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
संजय राऊत दोन दिवशीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असून आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेना अद्यापही जागेवर असल्याचा निर्वाळा यावेळी दिला. त्याचबरोबर शिंदे गटात गेलेले पदाधिकारी नारायण राणे, राज्य सरकार, मुख्यमंत्री यांच्यावर सडकून टीका केली. याचबरोबर राऊत यांना राज ठाकरे हे शिवसेना भवनासमोर सभा घेणार असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले कि, कोणालाही शिवसेना भवनासमोर सभा घेण्यास बंदी नाही. राज ठाकरेंना घेऊ द्या. शिवसेना भवन (Shivsena Bhawan) हा सगळ्याच्या प्रेमाचा विषय आहे. तिथे प्रत्येकाचा आत्मा अडकलेला आहे. सभा घ्यायला कोणाची बंदी आहे का? राज ठाकरे सभा घेत असतील तर घेऊ द्या? याबाबत आम्ही काय सांगणार असे राऊत म्हणाले.
राज ठाकरे 2023 ची पहिली सभा शिवसेना भवन समोर घेणार आहे. यावर ते म्हणाले, घेऊ द्या, शिवसेना भवन विषयी सगळ्यांनाच प्रेम आहे. प्रत्येकाचा आत्मा तिथे अडकलेला आहे. सभा घ्यायला कोणाची बंदी आहे का? आम्ही रोज शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या घरासमोर सभा घेतो. महापालिका परवानगी देणार असेल तर घेतील सभा. महापालिका परवानगी देणारच आहे, कारण सरकार त्यांच आहे. ते सुद्धा भाजप पुरस्कृतच आहे सगळं. परवानगी आम्हाला मिळत नाही, आम्हाला संघर्ष करावा लागतो. कारण सरकारला आमची भीती आहे. ज्यांची भीती नसते सत्ताधाऱ्यांना, त्यांना कुठेही परवानगी मिळते, अशा शब्दांत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे.
सरकार व्हेंटिलेटरवर
नागपूरला उद्धव ठाकरे यांच्या सोबत होतो. अधिवेशनात अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर आले, तरी सरकार गप्प आहे. महत्वाचे म्हणजे हे सरकार अस्तित्वात नाही. सरकार गेंड्याच्या कातडीचे असून पाण्यात बसलेल्या म्हशी साररखे सरकार आहे. एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह 6 मंत्र्यावर आरोप झाले. तरीदेखील सरकार गप्प आहे. सध्या सरका मध्ये दोन गट पडलेले असून तुमचं तुम्ही बघा, आमच आम्ही बघतो, अस सुरू सुरू आहे. मात्र महाराष्ट्रात चित्र हळू हळू बदलत आहे. सरकार व्हेंटिलेटरवर असून सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही. लवकरच कायद्याप्रमाणे 16 आमदार अपात्र ठरतील, असा इशारा यावेळी राऊत यांनी दिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nashik Sanjay Raut : संजय राऊत मागच्या सामन्यात पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड, आज पहिल्याच बॉलवर चौकार