Nashik Sanjay Raut : राजकीय वातावरण एका परिवर्तनाच्या दिशेने चालले असून 2024 च्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. पण त्याच्या आधीच परिवर्तन होणार असून हे राज्य  सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, कारण सरकार सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे मत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले आहे. 


संजय राऊत दोन दिवशीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असून आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेना अद्यापही जागेवर असल्याचा निर्वाळा यावेळी दिला. त्याचबरोबर शिंदे गटात गेलेले पदाधिकारी नारायण राणे, राज्य सरकार, मुख्यमंत्री यांच्यावर सडकून टीका केली. शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत.  आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याबरोबर असून शिवसेना हा एक महा वृक्ष आहे. या महावृक्षाचे बीज बाळासाहेबांनी पेरले असून सध्या कचरा पाला पाचोळा पडतो आहे, कचरा होतो, तो कचरा काही लोक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उचलून नेत आहेत. त्या कचऱ्यासमोर मुख्यमंत्री भाषण करत असल्याचे ते म्हणाले. 


ते पुढे म्हणाले, अधिवेशन काळामध्ये स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर नागपुरात होतो. यावेळी सरकारचा गोंधळ जवळून पाहिला. यावरून असे वाटते आहे कि सरकार अस्तित्वातच नाही, रोज एका मंत्र्यांच्या भ्रष्ट्राचाराचे प्रकरण समोर येत सरकार गेंड्याच्या कातडीप्रमाणे गप्पगार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भूखंडाची दोन प्रकरणे, त्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भूखंडाची दोन प्रकरणे, उदय सामंत यांचे प्रकरण काढले अशी अनेक प्रकरण अधिवेशन काळात येऊन सुद्धा सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं होते. संविधान कायद्यानुसार 16 आमदार अपात्र ठरतील. संविधान, घटना आणि कायदा देशात आहे. त्याचा व्यवस्थित वापर झाला तर हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा सूचक विधान संजय राऊत यांनी यावेळी केले. 


संजय राऊत पुढे म्हणाले, पूर्वी महाराष्ट्र एखाद्या मंत्र्यावर आणि मुख्यमंत्री हायकोर्टाने ताशेरे मारले तरी ते राजीनामे देत होते, पण एका अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांना भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरण येऊन सुद्धा, पुरावे देऊन सुद्धा सरकार त्यांच्या ठोंब्याप्रमाणे बसून काम करत आहे.सरकारची कामे वेगळ्या पद्धतीने सुरू आहेत, सरकारमध्ये सरळ सरळ दोन गट पडलेले आहेत. तुमचं तुम्ही बघा, आमच आम्ही बघतो. त्यांचे सरकार चाळीस आमदारांच्या पलीकडे नाही. चाळीस आमदारांची ख्याली खुशाली, त्याला खुश करणं एवढेच सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात राजकीय वातावरण एका परिवर्तनाच्या दिशेने चालले असून 2024 ची तयारी सुरू आहे. पण त्याच्याआधीही परिवर्तन होऊ शकेल. हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही. व्यवस्थित दबाव आला तर? संविधान घटना आणि कायदा याचे उल्लंघन करणारे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार असा इशारा या निमित्ताने संजय राऊत यांनी राज्य सरकारला दिला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :