Nashik Sanjay Raut : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तांतरानंतर नाशिकच्या (Nashik) राजकारणाचे निकषच बदलून गेले आहेत. शिवसेनेतील (Shivsena) अनेक जण शिंदे गटात गेल्याने शिवसेना एकटी पडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे संजय राऊत (Sanjay Raut) जेव्हा जेव्हा नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले आहेत,. तेव्हा तेव्हा शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश होत आहे. नुकतेच संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले असता सुरगाणा (Surgana) नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. 


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले होते. काल त्यांनी त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwer) जात जोतिर्लिंगाचे दर्शन घेत विधिवत पूजा केली. यानंतर ते नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या (Surgana Nagarpanchayat) नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाला जबर धक्का बसल्याचे या प्रवेशावरून दिसून आले. महत्वाचे म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊ चौधरी (Bhau Chaudhari) यांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याचे सांगण्यात येत आहे. 


संजय राऊत नाशिक मध्ये असताना सुरगाणा नगरपंचायतच्या नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांची ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शनिवारी रात्री संजय राऊत शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी प्रवेश सोहळा झाला. यात नगराध्यक्ष भरत वाघमारे,घटनेता सचिन आहेर, नगरसेविका पुष्पाताई वाघमारे, अरुणाताई वाघमारे, प्रमिलाताई भोयर यांच्यासह सुरगाणामधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताना या नगरसेवकांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या वाचाळ वृत्तीस कंटाळून आम्ही ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतला, असं या नगरसेवकांनी म्हटलं आहे.


 बैलगाडीतून राऊत यांची मिरवणूक


दरम्यान आज सकाळी संजय राऊत निफाड तालुकयातील वडनेरभैरव येथे दौऱ्यानिमित गेले. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते कृषी विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांनचा सन्मान केला जात आहे. संजय राऊत यांचे एकेकाळचे निकटवर्तीय भाऊ चौधरी यांच्या गावात हा कार्यक्रम होत असल्याने राऊत भाषणांत काय बोलतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते कृषी विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वडनेरभैरवमध्ये संजय राऊत यांचे जंगी स्वागत करण्यात आले. येथील ग्रामस्थांनी बैलगाडीतून राऊत यांची मिरवणूक काढण्यात आली. राऊत यांनी वडनेर भैरवमध्ये भैरवनाथ आणि दत्त मंदिरात जावून देवदर्शन घेतल. संजय राऊत यांचे एकेकाळचे निकटवर्तीय भाऊ चौधरी यांच्या गावात हा कार्यक्रम होत असल्याने राऊत भाषणांत काय बोलतात? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.