Sanjay Raut On Belgaum : जर सरकारला जमत नसेल तर आम्हाला बेळगावला (Belgaum) जाता येते असा थेट इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी (CM OF Karnataka) सचिवांद्वारे महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावमध्ये येऊ नये अशी नोटीस अशी सूचना पाठवलेली त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


शिवसेनेचे नेते तथा उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय राऊत (Sanjay Raut) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान नाशिक शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. आज अधिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी शिंदे भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. सकाळपासुन आज त्यांनी विविध ठिकाणी भेट शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक वादावर आपली सडेतोड प्रतिक्रया व्यक्त केली. 


यावेळी ते म्हणाले कि, राज्यात क्रांतिकारक सरकार आलेला आहे. त्या क्रांतिकारक सरकारच्या काळामध्ये मस्ती वाढायला लागली आहे. मात्र मुख्यमंत्री आणि त्यांच्या गटाला महाराष्ट्र कळलेला दिसत नाही. मुख्यमंत्री हे केवळ चाळीस आमदारांचेच मंत्री, दोन पाच बिल्डरांचेच मंत्री असल्याचे दिसते. कर्नाटक च्या मुख्यमंत्र्यांनी आज नवीन नोटिफिकेशन आलेले आहे. त्यानुसार बेळगावात येण्यापासून मंत्र्यांना रोखलं आहे. आम्हाला रोखल, आमच्यावर कारवाया झाल्या हे ठीक आहे. पण मंत्र्यांना तुम्ही कसं काय रोखू शकता, हे एकप्रकारे घटनेला संविधानाला दिलेले आव्हान असल्याचे राऊत म्हणाले. 



तसेच या देशातला नागरिक कुठे जाऊ शकतो. आमची भूमिका काय तर मुख्यमंत्री महोदयांना याचे उत्तर माहित नसेल तर उपमुख्यमंत्री यांनी बोलावं, नाहीतर आम्ही बोललो तर तुम्हाला त्रास होतो. त्यामुळे बेळगाव प्रश्नी जर सरकारला जमत नसेल तर आम्हाला बेळगाव जाता येते असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सचिवांद्वारे महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावमध्ये येऊ नये अशी नोटीस पाठवलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले. देशातला नागरिक कुठेही जाऊ शकतो, त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही सूचना हा म्हणजे घटनेला दिलेले आव्हान असल्याचा संजय राऊत यांनी म्हटलं. जर सरकार मधल्या मंत्र्यांना तिथे जायला जमत नसेल तर आम्ही जाऊ असं थेट आव्हानही संजय राऊत यांनी राज्य सरकारला दिले आहे.