Nashik News : नाशिक (Nashik) शहरात 01 डिसेंबर पासून सुरू झालेल्या हेल्मेटसक्ती (Helmet) मोहिमेत कारवाईचा बडगा उगरण्यात आला. पहिल्याच दिवशी साडे पाचशेहून अधिक दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली. तर जवळपास पावणे तीन लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. 


नाशिकमधील हेल्मेट सक्तीची (Helmet Campaign) मोहीम पुन्हा जोर धरू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांनी हेल्मेट सक्ती अनेक मोहीम राबविल्या. मात्र नाशिककरांचा रोष आणि अत्यल्प प्रतिसादामुळे मोहीम थंड पडल्या. मात्र, आता पुन्हा मोहिमेला सुरुवात झाली असून 01 डिसेंबर पासून शहरात हेल्मेट न वापरणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली. 


दरम्यान या पार्श्वभूमीवर शहरातील महत्वाच्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी पाच ते सात अशा वेळेत पोलिसांनी दुचाकी चालकांवावर दंडात्मक कारवाई करत हेल्मेट सक्ती करण्यात आली. त्यानुसार नाशिक शहर वाहतूक शाखेच्या युनिट एक ते चार कार्यक्षेत्रातील स्वामींनारायन चौक, औरंगाबाद नाका, संतोष टी पॉईंट, एबीबी सर्कल, अशोक स्तंभ, गरवारे पॉईंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको कॉलेजसमोर नाशिकरोड अशा आठ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.


नाशिक शहरातील चेकिंग पॉईंटवर प्रत्येकी एक अधिकारी, शहर वाहतूक शाखेकडील 3 अंमलदार, पोलीस ठाण्यातील 3 अंमलदार नेमण्यात आले आहेत. दरम्यान आज नाशिक शहरातील आठ चेक पॉईंटवर 554 विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली. या करवाईतून जवळपास 2 लाख 77 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. काही दिवस थंडावलेल्या हेल्मेटसक्ती मोहिमेला नाशिककरांना पुन्हा सामोरे जावे लागत आहे. 


इथे होत आहे तपासणी
नाशिक पोलिसांकडून शहरातील चेकिंग पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. आज दुसऱ्या दिवशी कारवाई शहरातील तारवाला सिग्नल, राज स्वीट, सिटी सेंटर मॉल, बाफना ज्वेलर्स, खुटवड नगर, माऊली लॉन्स, विहित गाव, भैरवनाथ मंदिर आदी परिसरात होणार आहे. सकाळी दहा ते बारा तर सायंकाळी चार ते आठ वाजेपर्यंत हि कारवाई सुरु राहणार आहे. काल रोजी शहरातील स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉईंट, एबीबी सर्कल, अशोक स्तंभ, गरवारे पॉईंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको कॉलेजसमोर चेकिंग होणार आहे. सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत गाड्यांची चेकिंग करण्यात आली.