एक्स्प्लोर

Nashik News : सारथीच्या उद्घाटन पत्रिकेत संभाजीराजे छत्रपतींना डावललं, नाशिकमध्ये मराठा संघटना आक्रमक 

Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) होत असलेल्या सारथी कार्यालयाच्या (sarthi Office) उदघाटनावरून वादाला तोंड फुटले आहे.

Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) होत असलेल्या सारथी कार्यालयाच्या (sarthi Office) उदघाटनावरून वादाला तोंड फुटले असून सारथीच्या उदघाटन कार्यक्रम पत्रिकेत संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrpati)  यांचे नावच नसल्याने मराठा संघटना (Maratha Organization) आक्रमक झाल्या आहे. सारथीच्या उद्घाटन पत्रिकेत संभाजीराजे छत्रपती यांना डावललं, असा आरोप मराठा संघटनांनी केला आहे. संभाजी महाराजांना डावलल्यास कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर (Karan Gaikar) यांनी दिला आहे. येत्या 21 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज त्याचबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी संभाजीराजे छत्रपती नेहमीच तत्पर असतात. याच अनुषंगाने संभाजीराजे छत्रपती यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुणे येथील सारथीच्या धर्तीवर नाशिकमध्ये सारथीचे कार्यालय व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. सारथी या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील विदयार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिक सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये वसतिगृह, अभ्यासिका त्याचबरॊबर इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना या सुविधा घेण्यासाठी पुणे येथे जावे लागायचे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक वर्षांपासून त्या त्या जिल्ह्यात सारथीचे कार्यालय असावे यासाठी पाठपुरावा केला होता. 

दरम्यान सारथीचे केंद्र नाशिकमध्ये व्हावे यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार हेमंत गोडसे पाठपुरावा करत होते. या प्रयत्नानंतर अखेर सारथीचे कार्यालय नाशिकमध्ये आले. याच सारथीच्या कार्यालयाचे उदघाटन येत्या २१ ऑक्टोबर रोजी होत असल्याने या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यास बरोबर इतरही मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच संभाजीराजे छत्रपती यांना देखील आमंत्रण देण्यात आले होते. मात्र निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने कार्यक्रमाला संभाजीराजे छत्रपती यांना डावलल्याचा आरोप स्थानिक मराठा संघटनांनी केला आहे. त्यावरून नवा वाद उपस्थित झाला आहे. 

संघटेनचे कार्यकर्ते आक्रमक 
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथीचे विभागीय कार्यालय नाशिकरोड येथे होत आहे. नाशिकच्या नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालय परिसरात सारथीचे कार्यालय साकारण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दादाभुसे, अतुल सावे या मंत्र्याची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ज्यांनी विभागात सारथीच्या कार्यालयाची मागणी केली त्यांनाच उद्घाटनाला न बोलविल्याने संभाजी राजे छत्रपती यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. सारथी संस्थेच्या कार्यक्रमाला संभाजीराजे छत्रपतींना डावलल्याचा आरोप होत असून कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी दिला आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget