Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील (Peth Taluka) 69 ग्रामपंचायत निवडणुकांचा (Grampanchayat Election) निकाल हाती आला असून यामध्ये राष्ट्रवादीने (NCP) सर्वाधिक 21 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र भाजप आणि शिंदे गटाला जोरदार धक्का मिळाला आहे. या 69 ग्रामपंचायतीमध्ये एकही जागा भाजप (BJP) किंवा शिंदे गटाला मिळालेली नाही. त्यामुळे पेठ तालुक्यात भाजप आणि शिंदे गटाला नागरिकांनी सपशेल नाकारल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल घोषित होत असून आतापर्यत चारही तालुक्यातील काही ग्रापंचायतींचा निकाल हाती आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात राष्ट्रवादीची सरशी असून त्या पाठोपाठ शेवटच्या घटकात शिवसेनेने मुसंडी मारली आहे. दरम्यान पेठ तालुक्यातील 69 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळपासून मतमोजणी प्रक्रिया सुरु होती. सुरवातीपासूनच राष्ट्रवादीने सरशी घेतली होती. त्यानंतर लाल बावटा काही ठिकाणी फडकत होता. मात्र सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे घड्याळ आघाडीवर असून शिवसेना दुसऱ्या स्थानी आहे.
दरम्यान पेठ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत मतमोजणीच्या सर्व 14 फेऱ्या पूर्ण झाल्या असून अंतिम निकाल हाती आला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीने पेठ तालुक्यात मुसंडी मारली असून शिवसेना दुसऱ्या स्थानी आहे. अपक्षांनी जोरदार कमबॅक केले आहे. तर विशेष म्हणजे 69 ग्रामपंचायतीपैकी एकही जागा भाजप आणि शिंदे गटाला मिळवता आलेली नाही. त्यामुळे हा सर्वात मोठा पराभव सांगितला जात आहे. पेठ तालुक्यातील एकूण 69 ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी 21, शिवसेना 15, अपक्ष 31, माकप 01 तर काँग्रेस 1 जागेवर विजयी झाले आहेत. या निकालावरून राष्ट्रवादी, शिवसेनेचा प्रभाव असलेल्या तालुक्यात अपक्ष उमेदवारांची सरशी झाली आहे. मात्र भाजप आणि शिंदे गटाला एकही जागा मिळवण्यात यश आले नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पेठ तालुक्यातील 69 ग्रामपंचायतींचा निकाल
आंबे - मेघराज भागवत राऊत (राष्ट्रवादी), सुरगाणे - नेवाळ नामदेव (अपक्ष), धोंडमाळ - शिंगाडे बायजबाई मधुकर (अपक्ष), कोहोर - शांताबाfई शांताराम चौधरी (शिवसेना), पाहुचीबारी - रमेश जगन्नाथ चवरे (राष्ट्रवादी), करंजखेड - कमलेश हनुमंत वाघमारे (अपक्ष), कळमबारी - विष्णू काशिनाथ मुरे (शिवसेना), माळेगाव - दिलीप दामू राऊत (राष्ट्रवादी), शिवशेत - सुनंदा येवाजी भडगे (राष्ट्रवादी), कोपूरली बुद्रुक - मीराबाई भाऊराव वाघेरे (राष्ट्रवादी), जोगमोडी हेमराज दामू राऊत (अपक्ष), कापूर्णे दाभाडी - उषा पुंडलिक गवळी (अपक्ष), कोपूरली खुर्द - मनीषा गणपत पालवी (राष्ट्रवादी), हातरुंडी - शोभा गोवर्धन सातपुते - (अपक्ष), तिरढे - सोमनाथ नामदेव नाठे - राष्ट्रवादी, जुनोठी - संदीप चंद्रकांत भोये - अपक्ष, खिरकडे - कलावती सुरेश भोये - अपक्ष, कायरे - प्रभावती पुंडलिक सातपुते - राष्ट्रवादी, दोनवाडे - सुरेश जाधव - राष्ट्रवादी, जळे - मनोहर लक्ष्मण चौधरी - अपक्ष, कुळवंडी - सुनंदाबाई हेमराज सहारे - काँग्रेस, उंबरदहाड - जिजाबाई कुंभार - राष्ट्रवादी, अशोक मुकणे - बाडगी - अपक्ष, लिंगवणे - सोमनाथ शांताराम पोटींदे - अपक्ष, आड बुद्रुक - घनश्याम महाले - अपक्ष, भायगाव - शंकूतला मनोहर चौधरी - राष्ट्रवादी, हनुमानवाडी - पद्माकर पांडुरंग गायकवाड - अपक्ष, हनुमंतपाडा - वृषाली जनार्दन गवळी - अपक्ष, जांभूळमाळ - एकनाथ ढाडर - अपक्ष, एकदरे - गुलबा जगन सापटे - शिवसेना, उस्थळे - चंद्रकला चिंतामण भुसारे - राष्ट्रवादी, शिंदे - रोहिणी सुरेश गवळी - राष्ट्रवादी, करंजाळी - दुर्गनाथ नारायण गवळी - राष्ट्रवादी, गांगोडबारी - मोहन हिरामण गवळी - शिवसेना, देवगाव - यादव रावजी राऊत - अपक्ष, सावळघाट - मनोज हरी भोये - राष्ट्रवादी, बोरवट - पंकज दिलीप पाटील - अपक्ष, उंबरपाडा - अनिता सचिन गवळी - अपक्ष, कोतंबी - किरण पुंडलिक भुसारे - शिवसेना, उभीधोंड/मांगोने - हेमराज भगवान गवळी - अपक्ष, कुंभारबारी - दीपाली किरण भोये - राष्ट्रवादी, हरणगाव - पल्लवी विजय भरसट - अपक्ष, आसरबारी - गीता विशाल जाधव - काँग्रेस, वांगणी - मीरा संजय फुकाणे - शिवसेना, जांबविहीर - प्रवीण विठ्ठल गवळी - राष्ट्रवादी, रानविहिर - कौशल्या देवराम भुसारे - शिवसेना, खोकरतळे - सविता यशवंत भुसारे - शिवसेना, तोंडवळ - नामदेव गणपत वाघेरे - शिवसेना, आडगाव भु. - रेखा नेताजी गावित - माकप, कहाडोळपाडा - तुळशीराम विठ्ठल भांगरे - अपक्ष, धानपाडा - विठाबाई निवृत्ती गालट - शिवसेना, भुवन - विलास पांडुरंग दरोडे - अपक्ष, मनकापूर - भारती जगन रिंजड - अपक्ष, बोंडारमाळ/उमरद - रतन गंगाराम पेटार - अपक्ष, पिंपळवटी - राशी पंडित भांगरे - अपक्ष, गावंध - धनराज वसंत ठाकरे - शिवसेना, देवीचामाळ - नामदेव रामचंद्र गावित - अपक्ष, शेवखंडी - लिलाबाई मनोहर चौधरी - राष्ट्रवादी, शिंगदरी - तुळशीराम किसन पागी - अपक्ष, चोळमुख - कुसून नारायण पेटार - राष्ट्रवादी, घनशेत - शांता रविनाथ चौधरी - अपक्ष, पाटे - रुख्मिनी मधुकर गुंबाडे - शिवसेना, म्हसगण - उर्मिला विलास अलबाड - शिवसेना, कुंभाळे - मनोहर भाऊराव कामडी - शिवसेना, गोंदे - संदीप माळगावे - राष्ट्रवादी, राजबारी - शाम भास्कर गावित - शिवसेना, डोल्हारमाळ - संगीता मनोहर बठाले - राष्ट्रवादी, रुईपेठ - विनायक पुंडलिक भोये - अपक्ष, आमलोन - वनिता देवेंद्र भोये.