Sanjay Raut : कोबाड गांधी (Kobad Gandhi) यांचे पुस्तक असून अनघा लेले (Angha Lele) यांनी या पुस्तकाचे अनुवाद केला आहे. या अनुवादाच्या संदर्भात दिलेला पुरस्कार आहे. ज्या समितीने हा पुरस्कार दिलेला हा विचारपूर्वक दिला असल्याने घाईघाईनं पुरस्कार काढणे, हे लोकशाही स्वातंत्र्याला धरून नसल्याचे सांगत पुरस्कार रद्द करण्याची आवश्यकता नसल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगत सरकारवर हल्लाबोल केला. 


कोबाड गांधी (Kobad Gandhi) यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार' रद्द करण्यात आला. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. संजय राऊत आज नाशिकमध्ये (Nashik) आले असताना त्यांनी पत्रकार परिषदेत यावर वक्तव्य केले. ते म्हणाले, कोबाड गांधी याना अनेक दिवसांपासून वाचतो आहे, त्यांनी लिहलेल्या अनुभवावर आधारित पुस्तकाचे अनुवादन करण्यात आले होते. या पुस्तकाला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अचानक पुरस्कार काढण्यात आला. त्यामुळे हे लोकशाहीला धरून नसल्याचे सांगत हा निर्णय शहाणपणाचा नाही, अशी जोरदार टीका त्यांनी केली. 


ते पुढे म्हणाले, नक्षल वादा विरुद्ध आमची लढाई चालूच आहे. मधला काळामध्ये आनंद तेलतुंबडे यांना नक्षलवादाशी संबंध अटक करण्यात आली. आनंद तेलतुंबडे अडीच वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना तुरुंगात राहावे लागले. ही व्यवस्थेविरुद्ध लढाई आहे. कोबड गांधी यांचे अनेक वर्षांपासून लिखाण वाचतो आहे.  त्यांच्या अनेक गोष्टीविषयी आपण सहमत नसू. त्यांनी काही अनुभव लिहिलेले आहेत त्या अनुभवांचा अनुवाद अनघा लेले यांनी मराठीत यांनी केला आहे. अशा अनेक अनुवादित पुस्तकांना साहित्य अकादमी पुरस्कार देत असते. राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देत असते. पुरस्कार रद्द करण्याची आवश्यकता नाही. मी किंवा बाळासाहेब ठाकरे आम्ही लिहिणारे आणि बोलणारे लोक आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून बोलणं हा लोकशाहीचा प्राण आहे जे पटत नाही, त्याचा विरोध करणं महत्त्वाचा आहे. जो तुम्ही पुरस्कार दिलेला आहे तो विचारपूर्वकच दिलेला आहे. दिलेला पुरस्कार हा तुम्ही विचारपूर्वक दिला असेल मग आता तुम्ही अचानक घाई गडबडीने पुरस्कार काढणे, चुकीचे आहे. त्यामुळे लोक पुस्तक वाचायचे थांबणार नाही. किंबहुना प्रचार आता जास्त होईल. एक मोठा वर्ग त्याच्यामुळे नाराज झाला असून हा निर्णय शहाणपणाचा नसल्याचे राऊत बोलले. 


सरकारने साहित्यात हस्तक्षेप करणे अयोग्य - अजित पवार
अजित पवार म्हणाले,  साहित्यात राजकीय हस्तक्षेप वाढत आहे. हे गंभीर आहे. 6 डिसेंबर 2022 रोजी उत्कृष्ट साहित्याचे पुरस्कार जाहीर केले. त्यातील अनुवादित कोबाड गांधी यांच्या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर 6 दिवसांत अशा काही घटना घडल्या की, 12 तारखेला पुरस्कार रद्द केला. सरकारने यात हस्तक्षेप करणे अयोग्य आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र निर्मितीपासून साहित्य, कला, संस्कृतीला नेहमी मानसन्मान दिला. तिच परंपरा पुढे चालवली गेली. सहा दिवसांत अचानक सरकारने पुरस्कार समिती बरखास्त करून अनघा लेले यांचा पुरस्कार रद्द केला. सरकारने यात हस्तक्षेप करणं निषेधार्ह असल्याचे अजित पवार म्हणाले.