Nana Patole : कोणत्याही गोष्टीची वेळ काळ असते, सध्या पितृपक्ष (Pitru Paksh) सुरू आहे, योग्य वेळी रामजन्मभूमीवर जाऊ. मी अयोध्येला (Ayodhya) जाणार आणि तुम्हा सगळ्यांना घेऊन जाणार आहे. कोरोना (Corona) काळात पैसा नव्हता, पण भगवान श्री रामाच्या नावाने पाच दहा हजाराच्या वर्गणी गोळा केल्या गेली. हे गोळा केलेले पैसे कुठे गेले असा सवाल नाना पटोले (Nana Patole) यांनी उपस्थित केला. 


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज नाशिकमध्ये (Nashik) होते. त्यावेळी काँग्रेस मेळाव्यात (Congress Melava) त्यांनी एकला चालो रे ची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते बोलत होते. नाशकात कांदा (Onion) मोठ्या प्रमाणात पिकतो. परंतु या कांद्याचा भाव काय आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांचा खर्च ही निघत नाही. शेतकऱ्यांचे काही नाही त्यांना बरबाद करण्याचे कारनामे सुरू झाले आहेत. तसेच नाशिक (Nashik) हे धर्माचे आणि क्रांतीचे स्थान असून उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचे ठिकाण असल्याने अन्यायाविरुध्द लढण्याची ताकद या जिल्ह्यात असल्याचे पटोले म्हणाले. काँग्रेस असा पक्ष आहे, त्या पक्षात निवडणुकीने अध्यक्ष निवडला जातो. काँग्रेस मध्ये ही निवडणुकीची प्रक्रिया होते त्यातून सगळ्यांना जावं लागत. पक्षांतर निवडणुका होतात. कधी बिनविरोध होतात तर कधी निवडणूक प्रक्रिया होते, त्यातून सगळ्यांना जावं लागते. त्यामुळे काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार यात शंका नाही. सर्व कार्यकर्त्यांची हीच भावना असून कार्यकर्ता हाच पक्षाचा मुख्य घटक असल्याने काँग्रेसची देखील हीच भूमिका असल्याचे पटोले म्हणाले. 


कोरोना (Corona) जाणून बुजून देशात आणला. कोरोना काळात परिस्थिती बाबत खासदारांच्या समितीने रिपोर्ट दिला की दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारच्या चुकीमुळे मृत्यू जास्त झाले. केंद्रातील सरकार पश्चिम बंगालच्या निवडणूकित व्यस्त होते. देशाच्या सीमा बंद करण्यात आल्या नाहीत, गुजरात मध्ये गर्दी गोळा करण्यात आली. कोरोनासाठी सगळ्यांना दिवे पेटवायला लावल्याने डॉक्टरही परेशान झाले होते. ताट वाजवायला लावल्याने देशात अवदसा आली. कोरोना काळात पैसा नव्हता पण भगवान श्री रामाच्या नावाने पाच दहा हजाराच्या वर्गणी गोळा केल्या गेल्या. कुठले गोष्टीची वेळ काळ असते सध्या पितृपक्ष सुरू आहे, योग्य वेळी रामजन्मभूमीवर जाऊ. मी अयोध्येला जाणार आणि तुम्हा सगळ्यांना घेऊन जाणार असून गोळा केलेले पैसे कुठे गेले  असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला. 


बिर्याणी चालते का?
दरम्यान यावेळी नाना पटोले यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. आशिष शेलार मुस्लिम समाजावर टीका करतात. मात्र मुस्लीम समाजाची बिर्याणी यांना आवडते. याकूबचा भाऊ शेलारला बिर्याणीला चारतोय असा फोटोही व्हायरल होतो आहे. एकूणच हिंदू मुस्लिम मध्ये वाद वाढवला जात असून राज्यपाल तर अतिविद्वान आहेत, फडणवीसचाही गोल टोपी सोबत फोटो असल्याचे ते म्हणाले. ओबीसी हा समाज सत्ता परिवर्तन करू शकतो. तुमचे अधिकार काढण्यात आले, बरबाद करण्यात आलं. समान नागरी कायदा म्हणजे तुलाही नाही आणि मलाही नाही. मुफ्तीवर पाकिस्तानशी संबंध असल्याचे आरोप केले आणि त्यांच्या सोबत सरकार स्थापन केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.