Nashik Rain : गेल्या तीन दिवसांपासून नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात सूर्यदर्शनझाले नसून पावसाचा जोर कायम आहे. नाशिक सह गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं हजेरी कायम असल्याने गंगापूर धरणातून 5 हजार क्युसेकने (Water Discharged) गोदावरीच्या पात्रात विसर्ग सुरू झाला आहे. याच विसर्गामुळे गोदावरीच्या (Godavari) पाणी पातळीत वाढ झाली असून पुन्हा एकदा पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.


दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरासह जिल्हाभरामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे. काल रात्रीपासून जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. तर नाशिक शहरांमध्ये देखील संततधार सुरू असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर, अंबोली, वेळूंजे परिसरात पावसाची संततधार कायम असून गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे  गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग करण्यात येत आहे. 


सप्टेंबरच्या सुरवातीपासूनच पावसाने सुरवात केली असून मध्यंतरी पावसाने ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरूच आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस चालू आहे. त्याचबरोबर इगतपुरीमध्ये देखील पाऊस चालू आहे. नाशिक जिल्ह्यातील इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पालखेड धरण, मुकणे धरण परिसरात सर्व ठिकाणी पावसाचा जोर चालू आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने परिस्थिती बघून तिथला पाण्याचा विसर्ग हा देखील वाढवला जात आहे. त्यामुळे गोदावरीच्या नदीकाठी राहणार्‍या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 


सद्यस्थितीत गंगापूर धरणांतून 5 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू असून पावसाचा जोर असल्याने गंगापूर धरण पूर विसर्ग दुपारी 12 वाजता 3000 Cuses करण्यात आला होता. त्यांनतर दुपारी 1 वाजता 5000 क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्या टप्याने वाढवण्यात येईल. सध्या होळकर पुलाखालून देखील पाण्याचा वेग वाढलं असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे एकूणच नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढत असल्याने गंगापूर धरणातून 5000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग चालू आहे. 


भातशेतीवर संकट 
नाशिक जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने भात शेतीवर संकट कोसळले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात भात शेती मोठ्याप्रमाणावर केली जात असल्याने भात उत्पादकांची धावपळ उडाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ज्या शेतकऱ्यांनी भात लागवड केली होती. अशा भात लागवडीवर भात अंकुर धरत असतानाच त्या बीजात पाणी घुसल्याने शेतीला धोका निर्माण झाला आहे. तर काही भागातील भात शेती पूर्णतः पाण्यात गेल्याने भात शेती धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.