Nana Patole : ही कार्यकर्त्यांची निवडणूक (Election) असून एकला चलोरेची भावना कार्यकर्त्यांची असल्याने आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला. आघाडीपेक्षा स्वबळावर लढल्यास पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील आणि शहरात पक्षसंघटना वाढण्यास मदत होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress) नाना पटोले हे आज नाशिकमध्ये होते. त्यावेळी काँग्रेस मेळाव्यात त्यांनी एकला चालो रेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते बोलत होते. काँग्रेस असा पक्ष आहे, त्या पक्षात निवडणुकीने अध्यक्ष निवडला जातो. काँग्रेस मध्ये ही निवडणुकीची प्रक्रिया होते त्यातून सगळ्यांना जावं लागत. पक्षांतर निवडणुका होतात. कधी बिनविरोध होतात तर कधी निवडणूक प्रक्रिया होते, त्यातून सगळ्यांना जावं लागते. त्यामुळे काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार यात शंका नाही. सर्व कार्यकर्त्यांची हीच भावना असून कार्यकर्ता हाच पक्षाचा मुख्य घटक असल्याने काँग्रेसची देखील हीच भूमिका असल्याचे पटोले म्हणाले.
पटोले पुढे म्हणाले, राजकारणात या विषयात फिल्डिंग हा विषय नसतो, मी तुम्हाला निवडणुकीची प्रक्रिया सांगितली. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असते, तेंव्हा इथे फिल्डींग लोकांमध्ये लावावी लागते. काँग्रेस पक्षांतराची निवडणूक प्रक्रिया सुरू असून याबाबत उद्या मीटिंग ठेवली आहे. त्यात सर्व बीसीसी डेलिकेट त्याच्यामध्ये निर्णय होणार आहे. अध्यक्ष कोणता आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे की राहुल गांधींनी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष व्हावं यासाठी उद्या मीटिंग आहे. अशीच राज्याची प्रक्रिया होणार आहे, त्यात ज्याला कुणाला उभे राहायचं तो उभा राहू शकतो अशा प्रक्रिया चालूच राहणार आहे. हे बघा मी फार यामध्ये हापहापलेला नाही. राष्ट्रीय नेतृत्वाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली असल्याचे पटोले यांनी सांगितले.
मी विधानसभेचा अध्यक्ष असताना देखील त्या कृतीचा लोकांसाठी काय फायदा होतो हे दाखवलं. विधानसभा अध्यक्ष असताना मी ओबीसी बाबतचा ठराव आणला होता. जी जबाबदारी मला पक्षश्रेष्ठी देतात प्रामाणिकपणे निभावण्याच काम मि करतो. त्यामुळे जी काही व्यवस्था निर्माण होईल ते काम करायचं उद्या मला भूत ची जबाबदारी दिली तरी मी बूथ सक्षम करण्याचं काम करेल. त्यामुळे मला त्यात मागे पडल्याच भाव नाही
ग्रामपंचायत निडणुकीवर म्हणाले...
सध्या नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ग्रापंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यावर पटोले म्हणाले कि, ग्रामपंचायत निवडणुका सिंबोलिक नसतात. गावामध्ये यासाठी राजकारण होता कामा नये. म्हणून ग्रामपंचायत निवडणुका आपल्या राज्यात सिम्बॉलिक होत नाही. मात्र काही लोक माध्यमांच्या माध्यमातून आपला डंका वाजवण्याचे काम करतात, असा आरोपही यावेळी पटोले यांनी केला.