नाशिक : पुण्यात (Pune) स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता चांदवड शहर परिसरात टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यास तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतले असून टोलनाका व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. 


देशभरात काल स्वातंत्र्यदिन (Independence) उत्साहात साजरा करण्यात आला. अशातच नाशिकच्या चांदवड (Chandwad) येथील मंगरूळ टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पाकिस्तान जिंदाबादचे (Pakistan) नारे दिल्याची घटना घडली. त्यामुळे टोलनाक्यावर काम करत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना आश्चर्य व्यक्त केले. तातडीने स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. तसेच टोल प्रशासनाने तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यास निलंबित केले आहे. मात्र या घटनेने चांदवड शहरसह परिसरात चांगलीच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. 


दरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या नाशिकच्या चांदवड येथील मंगरूळ टोलनाक्यावरील कर्मचारी यास तातडीने निलंबित करण्यात आले आहे. टोल नाका व्यवस्थापक मनोज पवार यांनी ही माहिती दिली. काल भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा होत असतांना चांदवडच्या मंगरूळ येथील टोलनाक्यावरील कर्मचारी शेहबाज कुरेशी याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी घोषणा देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


पुण्यातही पाकिस्तान जिंदाबादचे नारे 


स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरू असताना सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहणाऱ्या दोघांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याची घटना घडली. काही नागरिकांनी घटनेची माहिती दिली. दरम्यान झाल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कुठला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही केली आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.



तिरंग्याचाही अवमान...


स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी पुण्यात तिरंग्याचा अवमान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पुण्यात म्युझिकल कॉन्सर्ट दरम्यान तिरंगा प्रेक्षकांमध्ये भिरकावला होता. पुण्यातील क्लबमध्ये गायिकेने नाचता नाचता थेट तिरंगा भिकावल्यानंतर थेट पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन तिच्यावर कारवाई केली. गायिका उमा शांती उर्फ शांती पीपल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्टेजवर डान्स करत असताना दोन्ही हातात तिरंगा घेऊन प्रेक्षकात फेकल्याचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहे. नंतर हातवारे करून असभ्य वर्तन केल्याची तक्रार नागरिकांनी केली होती.


संबंधित बातमी : 


Pune Crime news : पुण्यात चाललंय काय? स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात जिंदाबादचे नारे; दोघांना अटक