Nashik Crime : सद्यस्थितीत अनेकांच्या हातात मोबाईल आल्याने सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात होत चालला आहे. मात्र याच माध्यमातून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार देखील समोर येत आहेत. नाशिकमध्ये (Nashik) असाच प्रकार समोर आला असून वर्क फ्रॉम होम करण्याच्या नादात एका महिलेची 18 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Insta), व्हॉट्सअॅप, टेलिग्राम यासारख्या प्लॅटफॉर्मवर रोजगाराच्या अनेक जाहिराती आपल्याला दिसून येतात. अशावेळी अनेक तरुण-तरुणी रोजगार मिळेल, या आशेने संपर्क साधतात. मात्र काही वेळा तरुण-तरुणींची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार नाशिक शहरात घडला आहे. शहरातील सिडको भागातील खुटवड नगर येथील महिला टेलिग्रामवरुन वर्क फ्रॉम होमचे टास्क देऊन तिच्याकडून तब्बल 18 लाख रुपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेला प्रश्नावली देऊन आणि वारंवार बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये 24 बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडको परिसरातील (Cidco) खुटवड नगर येथील एका 32 वर्षे महिलेने याबाबत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार महिला मोबाईलवर ब्राउझिंग करत होती. याच वेळी 'वर्क फ्रॉम होम करा आणि काही दिवसात लाखो रुपये कमवा', अशी जाहिरात तिला आपल्या मोबाईलवर दिसून आली. पैसे कमावण्याच्या उद्देशाने महिला फिर्यादी यांनी मार्चमध्ये ही वर्क फ्रॉम होमची ऑफर स्वीकारली. यासाठी त्यांना पाठवलेल्या लिंकवर तांत्रिक पूर्तता केली. त्यानंतर त्यांना एका बँक खात्यावर ऑनलाईन पैसे भरण्यास सांगून काही प्रश्न पाठवण्यात आले. ही प्रश्नावली भरत असताना त्यांच्या मोबाईल लिंकिंग असलेल्या टेलिग्रामच्या खात्यात रीव्ह्यू पूर्ण केल्याचे गुण दाखवून बदल्यात रक्कम क्रेडिट होत असल्याचे दाखवण्यात आले.
अशी झाली फसवणूक
दरम्यान खात्यात पैसे जमा होत असल्याची खात्री पटल्याने फिर्यादी महिलेने महिनाभर रिव्ह्यू पूर्ण करण्यासाठी संशोधन सांगितल्यानुसार 3 ते 27 मार्च या कालावधीत विविध 24 बँक खात्यांवर एकूण 18 लाख 18 हजारांची रक्कम भरली. त्यामुळे त्यांना संबंधित संशयितांकडून प्रश्न पाठवण्यात आले. दरम्यान संबंधित महिला फिर्यादी यांनी प्रश्नाचे उत्तर दिले असता रिव्यू पूर्ण होण्यासाठी लागणारा शेवटचा प्रश्न गहाळ केला जात असे. त्यामुळे रिव्ह्यू पूर्ण झाले नाहीत. संबंध प्रश्नावली टाकत त्या त्या प्रश्नांची रक्कम ठरवून दिली होती. मात्र टास्क पूर्ण होताच पुन्हा जास्तीची रक्कम दाखवून प्रश्न पाठवले गेले. परंतु प्रश्न सोडवल्यानंतर त्याचा मोबदला रोख स्वरुपात क्रेडिट होत असल्याचे दाखवल्याने त्यांचा विश्वास वाढत गेला.
ही बातमी वाचा: