Nashik Cyber Crime : सोशल मीडियावर (Social Media) फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. यामध्ये अनेकदा महिलांना बळी पडताना दिसत आहेत. अशातच अश्लील व्हिडिओच्या (Video) मध्यमातून अनेकदा पैसे उकळल्याचे पारकर घडले आहेत. फेसबुकच्या (Facebook) वापरामुळे नाशिकमध्ये (Nashik) महिलेचा संसार मोडल्याची घटना समोर आली आहे.
किरकोळ वादातून पती पासून विभक्त राहणाऱ्या पत्नीने सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका तरुणांसोबत मैत्री करत या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान प्रेमात असल्याने दोघांमध्ये जवळीक वाढल्याने संशयित आणि नकळत मोबाईलमध्ये फोटो व्हिडिओ काढून ठेवले होते. काही दिवसांनी पती-पत्नी पुन्हा एकत्र आणण्यास तयार झाले. त्यामुळे विवाहितेने मित्राला भेटण्यास नकार दिला. मात्र या मित्राने दोघांचे खाजगी फोटो प्रतिसाद तिच्या नातेवाईकांना पाठवल्याने या विवाहितेचा जोडणारा संसार परत मोडकळीच आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पिडीतेच्या तक्रारीनुसार एक एप्रिल ते डिसेंबर 2022 या काळात पतीपासून विभक्त राहत असताना सोशल मीडियावर रोहित करण सिंग पांचाल यांच्याशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले दोघांमध्ये वारंवार मोबाईलवर बोलणे होत असायचे. त्यामुळे अल्पावधीतच ते दोघे एकमेकांच्या जवळ आले. संशयित रोहित पांचाल हा दिल्लीहा राहणारा असल्याने तो नाशिक शहरात येऊन पीडित विवाहितेला भेटला दोघांमध्ये जवळच निर्माण झाली होती.
संशयित आणि त्याचे फोटो व्हिडिओ मोबाईल मध्ये काढून घेतले होते. दिल्लीमध्ये असताना संशयित आणि पीडित महिला मोबाईलवर व्हिडिओ कॉल करत असत, संशयित संशयित स्क्रीनशॉट काढून ठेवले. दरम्यान दोघांमध्ये प्रेम संबंध बहरत असताना विवाहिता आणि तिच्या पतीच्या कुटुंबीयांनी दोघांनी एकत्र यावे. यासाठी प्रयत्न केले. या बाबत पीडितेने संशयित प्रियकराला याबाबत सांगितले. त्यामुळे आपण आता भेटणार नाही, त्यामुळे आपले संबंध संपले. याचा संशयितास राग येऊन त्याने पीडित महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पीडीतेचा पती, मामा आणि आई-वडिलांना पाठवून दिले. तसेच सोशल मीडियावर व्हायरल केले. नातेवाईकांना आक्षेपार्य असे फोटो पाठवण्यात आल्याने. पीडित महिलेच्या पतीसह नातेवाईकांनी पुन्हा काडीमोड घेतला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियासिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
दुसरी एक घटना नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आडगाव परिसरात पीडित महिवाल देखील सोशल मीडियाची शिकार बनली आहे. आडगाव पोलिस व पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार इंस्टाग्रामवर एका संशयिताने पाठलाग करून मॅसेज करण्यास सुरवात केली. त्यानंतर अश्लील मॅसेज येण्यास सुरवात झाली. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी आयटी ऍक्ट अंतर्गत संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री नंतर प्रेम आणि मग अश्लील व्हिडिओच्या साहाय्याने महिलांना त्रास देण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया वापरताना योग्य ती काळजी घेणे महत्वाचे ठरते, असे या घटनांवरून निदर्शनास येते.