Nashik News : मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2023) आठ ते दहा दिवसांमध्ये मोठया प्रमाणावर पतंगबाजी होत असते. मात्र अशावेळी पशु पक्ष्यांसह नागरिक जखमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे नाशिक (Nashik Police) पोलिसांनी आता विशेष मोहीम हाती घेतली असून नाशिकमध्ये नायलॉन मांजा हस्तगत केला जात आहे. 


गेल्या चार दिवसांपासून नाशिक (Nashik) पोलिसांनी आता या मांजा विक्रेत्यांविरोधात थेट तडीपाडीची कारवाईची सुरू केली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये जवळपास 16 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना 144 कलम अंतर्गत नोटीसी बजावली जात आहे. या संशयिताकडून पुन्हा नायलॉन मांजा विक्री होऊ नये, याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली असून यामध्ये सरकार वाडा, पंचवटी, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या 16 विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कोणाला सात दिवसांसाठी तर कोणाला पंधरा दिवसांसाठी नाशिक शहरांमध्ये येण्यास मनाई ही करण्यात आली आहे. त्यामुळे एकंदरीतच या कारवाईचे स्वागत हे करण्यात येते. 


मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या संक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजी करण्यासाठी सर्वजण आतुरता अशातच नायलॉनच्या मांजाची सर्रास विक्री होतानाही दिसते. या मांजामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे आता नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर थेट तडीपाडीच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत दहा जणांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. नायलॉन मांजा मुळे होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. एकीकडे नायलॉन मांजा विरोधात नाशिक पोलिसांची कारवाई सुरू असली तरी दुसरीकडे मात्र नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीमध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे नाशिक पोलीस ज्या प्रकारे मांजा विक्रेत्याविरोधात आक्रमक होत आहेत. त्याचप्रमाणे इतर गुन्हेगारी विषयी देखील पोलिसांनी तत्पर होणे गरजेचे असल्याचे या निमित्ताने अधोरेखित होते आहे.


16  जणांवर कारवाई 
घातक नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आणि बाळगणाऱ्या आणखी दहा मांजा विक्रेत्यांना नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. नाशिक शहर पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांना नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. मकर संक्रांती सणानिमित्त शहरात जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात. पतंग उडवताना नायलॉन मांजाचा सर्रास वापर केला जातो. मांजा विक्रेत्यांवर शहर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. तरीही नायलॉन माजांचा साठा व विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून समोर आले आहे. दोन दिवसात एकूण 24 माझ्या विक्रेत्यांना शहरातून तात्पुरते सात ते 15 जानेवारी या कालावधी करता शहरातून तडीपार करण्यात आले आहे.