Nashik Crime : नाशिक शहरात चोरीच्या घटनां सातत्याने उघडकीस येत आहेत. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामतवाडे परिसरात घरफोडी करणाऱ्या संशयितासह मोटारसायकल चोराला ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांकडून ६५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह एक दुचाकी असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रविण पोपट गुंजाळ यांच्या घरात (दि.06) अज्ञात चोरट्याने प्रवेश करून त्यांच्या घरातील 65 ग्रॅम सोने चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच (दि.28) ठक्का करभारी कोल्हे यांची दुचाकी संभाजी स्टेडीयम, बुरकुले हॉल जवळ पार्किंग केलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी चोरी केलेली होती. त्यावरून अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घरफोडी व मोटार सायकल चोरी गुन्हयांतील संशयितांबाबत पोलीस शिपाई राकेश राउत यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार वपोनी भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश शिंदे, किरण गायकवाड आदींच्या पथकाने सापळा रचुन घरफोडीतील संशयित राहुल धनराज बडगुजर याला ताब्यात घेवून त्याच्याकडून 40.090 ग्रॅम सोन्याची लगड जप्त केली. तसेच अन्य 02 संशयितांना पकडुन चौकशी केली असता त्यांनी केलेली एक मोटार सायकल असा 2 लाख 50 हजार लाख मुद्देमाल जप्त करून घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड केले.
नाशिक शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत निबांळकर (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडीच्या गुन्हयाचा तपास पोलीस नाईक किरण देशमुख व मोटार सायकल चोरीचा तपास हरूण शेख करीत आहे.
चोरीच्या घटनांमध्ये वाढ
नाशिक शहरात गुन्हेगारी बळावत आहे. अशात शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या दुचाकी चोरांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे ठाकले होते. पोलिस विभाग सध्या कायदा- सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करत अन्यच कामांमध्ये अधिक मग्न असल्याने विविध प्रकारच्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकी चोरी घटनांचा विचार केला तर प्रत्येक पोलिस ठाण्यात दोन ते तीन दिवस आणि एक दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होत आहे.