Nashik News : गेल्या अडीच महिन्यांपासून अतिरिक्त पदभारावर कामकाज करणाऱ्या नाशिक (Nashik NMC) महापालिकेला अखेर पूर्णवेळ आयुक्त मिळाले असून, राज्य शासनाने मुंबई (Mumbai) येथील एम्प्लाईज स्टेट इन्शुरन्स कार्पोरेशनचे आयुक्त म्हणून काम पाहणारे डॉ. ए. एन. करंजकर यांची नियुक्ती केली आहे. तर जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांचीही मुंबई महापालिकेत (Mumbai NMC) सहआयुक्त म्हणून बदली केली असून, त्यांच्या जागी धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


गेल्या अडीच महिन्यापासून नाशिक (Nashik) मनपा आयुक्तपद रिक्त होते. अडीच महिन्यांच्या कालावधीत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानाईत यांच्याकडे महापालिकेचा अतिरिक्त पदभार सोपून कामकाजाचा गाडा हाकण्यात आला. मात्र पूर्ण वेळ आयुक्त नसल्याने महापालिकेच्या कामकाजावर त्याचा मोठा परिणाम होत होता. सिंहस्थ कुंभमेळा तीन वर्षांवर येऊन ठेपलेला असताना त्याच्या तयारीच्या दृष्टीने अतिरिक्त काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना निर्णयाचे अधिकार नसल्यामुळे मोठी पीछेहाट झाल्याचे चित्र आहे. तत्पूर्वी नाशिक (Nashik) महापालिकेचे मावळते आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार मे महिन्यात डॉ. पुलकुंडवार हे मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. तेव्हापासून महापालिकेचा अतिरिक्त पदभार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. 


तर मसुरी येथील प्रशिक्षण आटोपून पुलकुंडवार पुन्हा महापालिकेच्या सेवेत रुजू होण्यासाठी दाखल होण्यापूर्वी आदल्या दिवशीच शासनाने त्यांची बदली केली. पुलकुंडवार यांची शासनाने अवघ्या नऊ महिन्यातच पुणे येथे साखर आयुक्त म्हणून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बदली केली होती. दरम्यान जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दोन महिन्यापूर्वीच राज्य शासनाकडे पत्र देऊन बदलीची विनंती केली होती. मार्च 2022 मध्ये जिल्हाधिकारी पदाची सूत्रे घेतलेल्या गंगाथरण यांची शासनाने अवघ्या दीड वर्षातच बदली केली आहे. ते आता मुंबई महापालिकेत सहआयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. 


अडीच महिन्यानंतर मनपा आयुक्त 


दरम्यान आयुक्त नसल्यामुळे महासभा होत नसल्याने अनेक विभागांचे महत्त्वाचे निर्णय प्रस्ताव मान्यतेविना पडून होते. नाशिक महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त नेमण्यासाठी लोकप्रतिनिधी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे तसेच मंत्र्यांकडे मागणी केली असता दोन-चार दिवसात पूर्णवेळ आयुक्त नेमण्यात येईल, असे आश्वासन वेळोवेळी देण्यात आले. गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनाही निवेदन देण्यात येऊन त्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असल्याने नवीन आयुक्तांची नेमणूक होते किंवा नाही, याविषयी सांगू शकता व्यक्त केले जात होती. परंतु शुक्रवारी शासनाने या संदर्भात आदेश जारी करत नाशिकला जिल्हाधिकाऱ्यांसह मनपा आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik Shivsena : घरपट्टी कमी करण्याची केवळ घोषणा नको, जादा घरपट्टीची माफी करा, नाशिकमध्ये शिवसेनेत जुंपली