Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) आश्रमातील आदिवासी मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर ज्ञानदीप गुरुकुल (Tribal Girl Ashram) आश्रमास टाळे ठोकण्यात आले आहे. संबंधित मुलींना शहरातील शासकीय निवारागृहात हलवण्यात आले आहे.
नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील आश्रमात घडलेल्या अत्याचारानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. येथील सहा मुलींवर अत्याचार करणाऱ्या हर्षल मोरे यास तीस नोंव्हेबर म्हणजेच आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनतर आज त्यास न्यायालयात हजर करणार आहे. मात्र तत्पूर्वी पोलिसांनी या घटनेतील अनेक धागेदोरे शोधून तपस सुरु ठेवला आहे. अशातच येथील काही अल्पवयीन मुलींना त्यांच्या कुटुंबीयांकडे परत पाठवण्यात आले आहे. मात्र पीडित सहा मुलींना नाशिकच्या शासकीय निवारागृहात स्थलांतर केले असून त्यांची अजुनी चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान संशयितास जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी पीडित मुलींची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार वसतिगृह संचालक हर्षल मोरे याच्याव्यतिरिक्त अन्य दोन नातेवाईक देखील दैनंदिन व्यवहार व्यवस्थापित करण्यासाठी वसतिगृहात राहायचे, मात्र या नातेवाईकांचा हस्तक्षेप नसल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे पोलिसांचा संशय आहे. मात्र तपास सुरु असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, 2018 मध्ये वसतिगृह सुरू केल्यापासून संशयित अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता. काही मुलींवर एकापेक्षा जास्त वेळा लैंगिक अत्याचार झाले आणि त्यापैकी एका मुलीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्याचार झाले. वसतिगृहात 13 मुली होत्या, परंतु त्यापैकी सहा मुलींवर संशयिताने अत्याचार केल्याचे समोर आले. तर दुसरीकडे वसतिगृहही बंद करण्यात आले आहे. तर आश्रमा शेजारील नागरिकांना मात्र याबाबत काहीच माहित नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण आणि राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सायली पालखेडकर यांनीही पोलीस स्टेशनला भेट देऊन या प्रकरणाचा गांभीर्याने पाठपुरावा करण्याची विनंती नाशिक पोलिसांनी केली आहे.
नाशिकमध्ये अल्पवयीन मुलींसोबत संचालकाने केलेले कृत्य हे अत्यंत निंदनीय असून त्याबाबत लवकरात लवकर चार्जशीट दाखल व्हायला हवे. न्यायालयात हा खटला उभा राहण्यापर्यंत साक्षिदाराना संरक्षणही दिले गेले पाहिजे. चांगले विशेष सरकारी वकिलांमार्फत बाजू न्यायालयात मांडली गेली पाहिजे. मुलींना, पालकांचे साक्षीपुरावे नोदंवून त्यांनाही संरक्षण देणे आवश्यक असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी सांगितले.
आज न्यायालयात सुनावणी
नाशिकच्या ज्ञानदीप आश्रमाचा संचालक हर्षल मोरे उर्फ सोनू याला म्हसरुळ पोलिसांकडून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या कोठडीची मुदत आज संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला वाढीव पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोकिसंकडून करण्याची शक्यता आहे.