Nashik Crime : इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील गडगडसांगवी येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असतांना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली होती. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून याप्रकरणी आता नाशिकच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांसह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाणे (Vadivarhe Police) अंतर्गत ही घटना घडली होती. आगस्ट महिन्यातील हे प्रकरण असून तालुक्यातील गडगडसांगवी येथील स्वस्त धान्य दुकानासंदर्भात हे प्रकरण घडले होते. एका स्वस्त धान्य दुकानात काळा बाजार सुरु असल्याची तक्रार देण्यात आली हतोय. त्यानुसार संशयितांवर या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यानंतर संशयिताने न्यायालयात दाद मागत खोटे गुन्हयांसह जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार न्यायायलायाने या प्रकरणातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. 


गडगडसांगवी येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात काळा बाजार होत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक ग्रामीण पोलीस, पुरवठा अधिकारी यांच्या माध्यमातून संबंधितांवर गुन्हे दाखल झाले. यानंतर संशयिताने न्यायायालयात तक्रार दाखल केली. आपल्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे हे खोटे गुन्हे असून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप संशयिताने केला होता. या पार्श्वभूमीवर तक्रारदाराने न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यालयाच्या आदेशानुसार सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जातीवाचक शिवागीळ केल्याचा आरोप या सर्व अधिकाऱ्यांवर आहे. 


यामध्ये सहा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तत्कालीन पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil), इगतपुरीचे तहसीलदार, दोन पुरवठा अधिकारी, वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, कर्मचारी अशा एकूण सात जणांवर गुन्हे दाखल झाला आहे. यांच्यापैकी एक मनसेचे पदाधिकारी असून मात्र याच कारण असे सांगितले जात आहे कि, जमिनीच्या वादात मनसेचे पदाधिकारी व तत्कालीन पोलीस अधीक्षक यांच्याकडून कुठल्यातरी स्वरूपाचा हस्तक्षेप करण्यात आला होता. दरम्यान रेशन धान्य दुकानदाराचा यात काहीही स्वार्थ नसताना त्यामध्ये ही लिंक लावून खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे एकच गुंतागुंतीचे प्रकरण असून या प्रकरणी न्यायालयाकडून गुन्हा दखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणासंदर्भात नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


नेमकं प्रकरण काय? 
ऑगस्ट महिन्यात इगतपुरी तालुक्यातील गडगडसांगवी येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असतांना उपसरपंच आणि ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडल्याची घटना घडली होती. इगतपुरीचे तालुका पुरवठा निरीक्षकांनी याबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदारावर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.