Nashik Crime News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सुभाषचंद्र पारख, नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल 21 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले असून या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज पारख यांनीच या पतसंस्थेत अपहार केल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी निफाड विशेष न्यायालयाने सुनावली आहे.
गोल्डमॅन म्हणून पंकज पारख हे नाव महाराष्ट्रभर चर्चेत आहेत. येवला शहरात (Yeola City) पारख यांनी पतसंस्थेची स्थापना केल्यानंतर पारख यांनीच पतसंस्थेत तब्बल 21 कोटींचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पतसंस्थेतील सहाय्यक प्रबंधक यांनी तक्रार केली होती. त्यानुसार त्यांना अटक करण्यात येऊन काल निफाड विशेष न्यायालयात हजार करण्यात आल्यानंतर त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पतसंस्थेचे संस्थापक पंकज पारख (Pankaj Parakh), चेअरमन योगेश सोनी, व्यावस्थापक अजय जैन, आणि संचालक मंडळाच्या विरोधात सहायक निबंधक प्रताप पाडवी यांच्या तक्रारीनुसार 21 कोटी 96 लाख 99 हजार रुपयांचा अपहार (Bank Fraud) केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना संशयित पंकज पारख हे शहरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित पारख यांचा माग काढत नाशिक शहरातून अटक केली. ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक शहरात पारख राहत असलेल्या फ्लॅटमध्ये ही कारवाई केली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी पतसंस्थेचे संस्थापक पंकज पारख, अध्यक्ष योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन आणि संचालक मंडळाच्या विरोधात सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांच्या तक्रारीनुसार, 21 कोटी 96 लाख 99 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने संशयित पारख यांच्यासह इतर संचालकांची चौकशी करणे गरजेचे असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत दहा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
नेमकं प्रकरण काय?
संशयित पंकज पारख यांनी सुभाषचंद्र पारख या नावाने पतसंस्था स्थापन केली आहे. या पतसंस्थेतील सहाय्यक निबंधक यांनी पतसंस्थेच्या ताळेबंदचा आढावा घेतला असता लेखापरीक्षणामध्ये घोळ असल्याचे दिसून आले. शिवाय पतसंस्था तोट्यात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पतसंस्थेच्या ठेवी पतसंस्थेत न जमा करता 90 ते 100 कर्जदारांना मुदत पावती नसताना तसेच कर्जाची मागणी अर्ज नसताना मुदत पावतीवर कर्जवाटप केल्याचे लेखा परीक्षणात समोर आले. अनियमित कर्जवाटप केल्यानंतर वसुली केली नाही सोनेतारांना ठेवता कागदपत्रे कर्ज दिल्याचे समोर आले. यातून जवळपास 21 कोटी 96 लाख 99 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी तक्रार केली होती.