Nashik Police : आज मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे एक क्षणही मोबाईल (Mobile) इकडे तिकडे झाला तरी जीव कासावीस होतो. अनेक महत्वाचे फोटो, फाईल्स स्मार्ट फोनमध्ये (Smart Phone) सेव्ह केलेल्या असतात. अशात जर तुमचा मोबाईल हरवला तर तुम्ही पुरते गोंधळून जाल. कारण एका क्षणात सर्व आठवणींचा मेळा पुसला जाणार असल्याचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर दिसते. मात्र घाबरून जाऊ नका, नाशिक (Nashik Police) पोलिसांनी मोबाईल हरविल्यानंतर काय काळजी घ्यावी, याबाबत काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत,  ज्यामुळे तुमचा हरवलेला मोबाईल काही मिनिटातच तुम्हाला परत मिळू शकतो. 


आजकाल कधीही कुठेही आपण मोबाईल फोन (Mobile Phone) घेऊन फिरत असतो. अशावेळी मोबाईल कुठे पडल्यास, हरवल्यास गोंधळ निर्माण होतो. मोबाईल कसा शोधायचा याबाबत अनेक पर्याय आपण वापरून बघतो. मात्र अनेकदा मोबाईल सापडण्याचे सगळे मार्ग बंद होतात. अशावेळी तुमच्या मोबाईल फोनमधून अज्ञाताकडून अनुचित प्रकार केले जाऊ शकतात. जसे की बँक अकाउंट रिकामं होऊ शकते, फोटो, व्हिडीओ व्हायरल होऊ शकतात. त्यामुळे अशावेळी प्रसंगावधान राखत योग्य पर्याय निवडणे आवश्यक असते. मात्र नाशिक पोलिसांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर मोबाईल हरविल्यानंतर नेमकी नागरिकांनी काय काळजी घ्यायची आहे, सविस्तर लिहले आहे. त्यामुळे मोबाईल सापडण्याची शक्यता असते. 


दरम्यान फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास, अनेकदा बँक खाते खाली होण्याची शक्यता असते. त्यामुळे तात्काळ बँकेशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगणे महत्वाचे ठरते. त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे महत्वाचे असते. कारण आपला मोबाईल क्रमांक, बँक खाते वापरात असलेला युपीआय पिन आदी मोबाईलशी संबंधित असतात. त्यामुळे अशावेळी बँकेत संपर्क साधून या गोष्टी समजून घेणे गरजेचे असते. जेणेकरून मोबाईल हरविल्यानंतर त्याद्वारे अनुचित प्रकाराला आळा बसेल.  


मोबाईल हरविल्यानंतर घ्यावयाची काळजी 


फोन हरवल्या सर्वप्रथम जवळील पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी हरवलेला गहाळ झालेला मोबाईल मधील सिम कार्ड ब्लॉक करावे व त्याच नंबरचे दुसरे सिम कार्ड सुरू करून घ्यावे व ते सिमकार्ड CEIR रजिस्ट्रेशन करीत वापरावे. https://wwwceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाईटवर संपर्क साधावा. Block Stolen/ Lost Mobile यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी व सबमिट वर क्लिक करावे.पोलीस स्टेशनला दाखल केलेली तक्रार प्रत मोबाईल खरेदी बिल कोणतेही शासकीय ओळखपत्र यासोबत जोडावे. सॉफ्ट कॉपी ची साईज 500 केबी पेक्षा कमी नसावी. यावर आपल्याला तक्रार नोंदवल्याचा रिक्वेस्ट नंबर मिळेल हरवलेला मोबाईल ऍक्टिव्ह ऑन झाल्याची माहिती पोर्टल द्वारे रजिस्टर मोबाईलवर एसएमएस द्वारे मिळेल व सदरची माहिती पोलीस स्टेशनला कळवावे. (याबाबत नाशिक पोलिसांनी अधिकृत सोशल मीडिया संकेतस्थळावर आवाहन केले आहे.)