Nashik Bus Fire : नाशिकमध्ये (Nashik) येण्यापूर्वी बस थांबली होती, त्यानंतर आम्ही झोपलो, मात्र काही वेळातच एकाएकी अपघात झाला. आम्ही उठून बघतो तर आजूबाजूला आग लागली, फारच भयानक होत ते, लोक ओरडत होते, एकदम भयानक नजारा होता, बघवत नव्हतं, कसातरी बाहेर पडलो, आम्ही कसं बाहेर पडलो, हे देवालाच माहीत' अशी अंगावर काटा आणणारी अपघाताची आपबिती प्रवाशांनी कथन केली.
नाशिक शहराजवळ औरंगाबाद रोडवर आज पहाटेच्या सुमारास बस आणि ट्रक ट्रेलरचा भीषण अपघात (Nashik Bus Fire Accident) होऊन बारा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने पूर्ण बसचा (Bus Fire) कोळसा झाला आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 32 जण जखमी असून त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (Nashik civil hospital) उपचार सुरु आहेत. नाशिकच्या औरंगाबादरोड वरील मिरची हॉटेल जवळ आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात दहा लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एकूण 32 प्रवासी जखमी असून जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खिडकीतून उडी मारली
नाशिकच्या बस अपघातात वाशिमच्या गणेश लांडगे यांनी खिडकीतून उडी मारून स्वतःसह आते बहीण आणि तिच्या दोन लहान मुलांचा जीव वाचवला. नाशिक औरंगाबाद रोडवर खाजगी लक्झरी बसचा अपघात झालं. यामध्ये बारा जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. अतिशय भयानक अशी ही घटना असून काही प्रवासी जे आहेत ते सुखरूप बचावले आहेत. वाशिमचे लांडगे कुटुंबीय मुंबईला चालले होते. यावेळी एका अठरा ते वीस वर्षीय तरुणणे स्वतःचा जीव धोक्यात घालून आतेबहिणीसह दोघं लहान बालकांचा जीव वाचविला आहे. त्या सर्वाना खिडकीतून बाहेर काढत वाचवलं आहे.
कस बाहेर पडलो, देवालाच माहित...
नाशिकमध्ये येण्यापूर्वी बस थांबली होती, त्यानंतर आम्ही झोपलो, मात्र काही वेळातच एकाएकी अपघात झाला. आम्ही उठून बघतो तर आजूबाजूला आग लागली, फारच भयानक होत ते, लोक ओरडत होते,एकदम भयानक नजारा होता, माझ्या लहान भावाने गॅदरींतून वाट काढत आम्हाला खिडकीतून बाहेर काढले,तेव्हा आमचा जीव वाचला, गाडीतलं चित्र बघवत नव्हतं, कसतरी बाहेर पडलो, आम्ही कसं बाहेर पडलो, हे देवालाच माहीत' अशी अंगावर काटा आणणारी अपघाताची आपबिती लांडगे यांनी कथन केली.
बारा जणांचा मृत्यू
नाशिकच्या औरंगाबाद रोड वरील मिरची हॉटेल जवळ आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात बारा लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एकूण 32 प्रवासी जखमी असून जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत मृतांची ओळख पटवण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी डीएनए टेस्ट आणि इतर फॉरेस्निक टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिली आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयामध्ये स्थानिक आमदार, पदाधिकारी, शासकीय अधिकारी देखील मोठ्या संख्येने असून जिल्हाधिकारी गंगाधरन डी हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.