Nashik Bus Accident : नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. पहाटेच्या सुमारास बसमधील (Nahik Bus Accident) अनेक प्रवासी झोपेत असतानाच काळाचा घाला आला. खाजगी बसला आग लागून 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही आग एवढी भीषण होती की काही वेळात झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. त्यानंतर घटनेची माहिती आगीसारखी शहरात पसरली. काहींनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही आगीतच होरपळले. नेमकं काय घडलं?


10 जणांचा मृत्यू, 21 प्रवाशी जखमी


नाशिकमधील बस आग दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी गंगाठरन डी यांनी दिली आहे. तर 21 प्रवासी जखमी असून यापैकी एकजण गंभीर जखमी असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे पुढील उपचारांसाठी हलवण्यात येणार असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहचले असून पाहणी केली जात आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी करत माहिती दिली आहे की, ''या आगीत होरपळून काही जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.''


 






बसचा अक्षरश: कोळसा, अनेक प्रवाशांचा मृत्यू 
नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही भीषण घटना घडली आहे. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बसमधील काही क्षणात जळून खाक झाली आहे. आग एवढी भीषण होती की काही वेळात आगीत झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. चिंतामणी ट्रॅव्हलची ही यवतमाळ येथून मुंबईकडे निघालेली बस होती. दरम्यान नाशिकमधून ही बस मुंबईकडे मार्गस्थ झाली असतांना पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी यांनी सांगितले.


प्रवासी गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला
नाशिक सिटी लिंक बस सेवेच्या माध्यमातून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. जखमींवर उपचार सुरू झाले आहेत. प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक आवाज झाला आणि सर्व प्रवाशी जागे झाले, मात्र बसच्या अनेक भागात आग पसरली होती. अनेकांनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला.


पोलीस यंत्रणा खडबडून जागी, अग्निशमन दल घटनास्थळी


दरम्यान स्थानिक नागरिकांना बस जळत असल्याचे त्यांनी घटनेची पोलिसांसह अग्निशमन दलाला कळविली. त्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले, त्यांनी उड्या मारल्या तर आगीमुळे अनेक प्रवासी जळून खाक झाले.


अनेक प्रवाशांचा मृत्यू
दरम्यान पहाटेच्या सुमारास बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बस मधून हलविण्यात आले. अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकी देखील धाव घेतली. नाशिक पोलिसांसह अग्निशमनची वाहने अनेक तासाभरापासून घटनास्थळी असून आग विझवण्यात आली आहे.


संबंधित बातम्या


Nashik Bus Fire : नाशिक येथे बसला आग लागून मोठी दुर्घटना, 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, 38 जण जखमी