Poha GST : सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर (Festival) तसेच नागरिकांचा सकाळचा नास्ता (breakfast) महागला असून पोह्यांवर (Poha) जीएसटी लावण्यात (GST) आल्याने दरवाढ झाली आहे. यामध्ये पोह्यांच्या बंद पाकिटांवर जीएसटी लावण्यात आला असून सुट्ट्या पोह्यांवर जीएसटी लावण्यात आला नसल्याची माहिती मंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी दिली आहे. मात्र दर वाढल्याने गणेशोत्सव (Ganeshotsav) तसेच आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर गृहीणांचा बजेट कोलमडणार आहे.


गौरी-गणपती (Gauri Ganpati) पाठोपाठ दसरा, दिवाळी (Diwali) येणार असल्याने फराळाच्या किमती सुद्धा वाढणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागल्याने दरवाढ झाली आहे. त्यामुळे घराघरात फराळ बनवूनही परवडणार नसल्याचे गृहिणींनी सांगितले. प्रत्येकाच्या घरात पोहे गरजेच असतात आणि पोहे लवकर बनवले जातात.  जर पोहेच महाग झाले तर कसं होणार? सामान्य माणसांचं कसं होणार? गृहिणी म्हटलं म्हणजे नाश्त्याला काय बनवायचा हा प्रथम विचार येतो. पोहे जे प्रत्येकाच्या घरात असतात आणि कोणालाही कधीही पाहुणे आले तर सहजरित्या बनवले जातात, अशी प्रतिक्रिया गृहिणीने दिली आहे.  


तर पोह्यांवर झालेल्या दरवाढीवर मंत्री भारती पवार म्हणाल्या कि, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये निर्मला सितारामन यांनी जीएसटीच्या संदर्भात सांगितले आहे. ज्या ज्या राज्यांमध्ये ह्या जीएसटीच्या रेट काही प्रमाणात वेगवेगळ्या आहेत. तर काही राज्यांमध्ये त्या एव्हरेज पेक्षा सुद्धा जास्त आहे. त्या राज्यांनी काळजी घ्यावी आणि दुसरी गोष्ट की टॅक्स हे काही वस्तूंवर वाढवले आहेत, त्यामध्ये पॅकेज फुडवर वाढवलेले असून सुट्ट्या वस्तूंवर जीएसटी लावण्यात आला नसल्याचे मंत्री पवार म्हणाल्या. 


दरम्यान जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्यात आलेला आहे, मात्र 25 किलोच्या आतील गोष्टींवर जीएसटी लावण्यात आलेला आहे. म्हणजे धान्य, डाळी, रवा, मैदा, जे 25 किलोच्या आत आहे. त्यांना जीएसटी लागणार आहे. 25 किलोच्या वर ज्या वस्तू आहेत. त्यांना जीएसटी लागणार नाही. तसेच सरकारने  ऐन दिवाळीच्या तोंडावर लोकांच्या जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. पोहे, गुळ, आता मैदा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत,दुकानदार जेव्हा विकतो तो, त्याच्यावर पाच टक्के जीएसटी लावून मगच ग्राहकाला देतो, सामान्य ग्राहकांवर खिशावर भार पडणार असल्याची माहिती किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी दिली आहे. 


अशी झालीय दरवाढ 
पोहे 45 रुपये किलो वरून थेट आता 55 रुपये किलो, गुळ 50 रुपये किलो वरून 58 रुपये किलो, दही 65 रुपये किलो वरून 75 रुपये किलो, शेंगदाणा 115 रुपये प्रति किलो वरून 130 रुपये प्रति किलो, चणाडाळ 68 रुपये किलो वरून 74 रुपये प्रति किलो, मुगडाळ ९० रुपये किलो वरून शंभर रुपये किलो. अशा पद्धतीने जीवनावश्यक वस्तूंमध्ये भाववाढ झाली असून दिवाळीत किरणामालाच्या खरेदीसाठी नागरिकाना थोडं जास्त बजेट ठेवावा लागणार आहे.