Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून ते महानुभाव संमेलनासाठी (Mahanubhav Sammelan) नाशिकमध्ये असून विशेष म्हणजे या मंचावर एकनाथ खडसे (eknath Khadse) हे देखील उपस्थित आहेत. या दोघांमध्ये अद्याप कोणतीही चर्चा होताना दिसत नसल्याचे नमंचावर हातावर घडी आणि तोंडावर बोट अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर (Dongre Vastirguh Maidan) भगवान श्री चक्रधर स्वामी यांचे अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभाव संमेलन आजपासून सुरु झाले. ते बुधवार (दि 31) पर्यंत तीन दिवस चालणार असून आज पहिल्या दिवशी सकाळी चक्रधर स्वामींच्यां चरमाकीतस स्तनाक स्नान घालण्यात आले. दरम्यान दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन आले असताना दुसरीकडे मंचावर एकनाथ खडसे देखील उपस्थित असल्याचे मंचावर शांतता पसरल्याचे चित्र आहे.
दरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचा वाद राज्यात सर्वश्रुत आहे. त्यातच शिंदे- फडणविस सरकार स्थापन झाल्यापासून भाजप खान्देशातील मोठे नेते असून असून खडसे यांनी भाजप सोडल्यापासून गिरीश महाजन आणि खडसे यांच्या नेहमीच खटके पडत असतात. त्यामुळे या दोघांचा वाद नेहमीच चर्चेत असतो. शिवाय या दोघांच्या वादाला कारणीभूत हे देवेंद्र फडणवीस असल्याचे खडसे यांनी नाव न घेता अनेकदा राजकीय मंचावर म्हटले आहे. अशातच आज तीनही राजकीय नेते एकाच मंचावर आल्याने पुरता गोंधळ उडाला आहे.
या संमेलनास उपमुख्यमंंत्री देवेंंद्र फडणवीस उपस्थित असून त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित आहेत. राज्यात पुनश्च सत्तेवर आल्यानंतर त्यांचा हा पहीलाच दौरा असल्याने संयोजक व भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी सज्ज झाले आहेत. यावेळी संयोजकांतर्फे विविध मागण्या मांडल्या जाणार आहे. त्यात फडणवीस त्यांच्या पदारी काय टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विविध कार्यक्रमाची रेलचेल
आज प्रारंभ झाल्यानंतर तीन दिवसीय कार्यक्रमात भगवान श्री चक्रधर स्वामींच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या गंगा गोदावरीच्या नदीपात्रातील ढगातळी आसन या स्थानावरील मंदिराचा उद्घाटन समारंभ होणार आहे. या निमित्ताने धर्मसभा, संत महंतांची मिरवणूक व शोभायात्रा, भजन, कीर्तन, कथाकथन, प्राचीन, काव्यवाचन, कवी संमेलन व स्वामींच्या तत्त्वज्ञानावर चर्चाही रंगणार आहेत. या संमेलनास संपूर्ण देशभरातून संत, महंत, भिक्षुक, वासनिक, साहित्यिक, लेखक, कवी व साधकवृंद आले आहेत.
फडणवीस काय बोलणार?
एकीकडे महानुभाव पंथांचे संमेलन असल्याने राजकीय व्यासपीठ नसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमके काय बोलतात याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान सदर महानुभाव संमेलन जाहीर झाल्यापासून फडणवीस हे कार्यक्रमांसाठी येणार हे निश्चित होते. त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये आज दुपारी हजर होऊन कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत. दरम्यान सुरवातीला झालेल्या दीपप्रज्वलनातही महाजन-फडणवीस हे उभे असताना खडसे मात्र एकाच जागेवर बसून होते, त्यामुळे यात काय गौडबंगाल आहे हे आयोजकांना देखील कोडेच आहे.