Nashik Crime : नाशिक (Nashik) येथील म्हसरूळच्या ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात (Aadhar Ashram) अल्पवयीन आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण (Molestation) होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातुन धक्कादायक माहिती समोर आली असून संशयिताने आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape) केल्याचे उघड झाले आहे.


नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरात (Mhasrul Police) असलेल्या द किंग फाउंडेशन संस्थेच्या नावाने चालवले जाणाऱ्या ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात सहा मुलींचे लैंगिक शोषण तेथील संचालक संशयित हर्षल मोरे यांनी केल्याचे गेल्या आठवड्यात उघडकीस आले. या प्रकरणांने नाशिक जिल्ह्यासह राज्य सरकार देखील हादरून गेले आहे. महिला व बाल विकासमंत्र्यांसह महिला व बालविकास आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मागील गुरुवारी त्यास न्यायालयाने अत्याचार, पॉक्सो, व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी त्यास पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता 6 डिसेंबर पर्यंत पोलीस  वाढवण्यात आली आहे. मात्र यानंतर पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे


नाशिकच्या ज्ञानदीप आश्रम प्रकरणात नव नवी माहिती समोर येत असून संशयिताने आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. संबंधित पीडित मुलीसोबत संशयित हर्षल मोरे याने तिन वेळा केले अपकृत्य केल्याचे समोर आले असून मोबाईलवर घाणेरडे व्हिडीओ दाखवले तसेच मारून टाकण्याची धमकीही दिल्याचा गंभीर आरोप पिडीतेने केला आहे. याप्रकरणी काल पिडीतीने तक्रार देताच म्हसरुळ पोलीस ठाण्यात मोरे विरोधात अत्याचाराचा सातवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सहा डिसेंबरपर्यंत कोठडी
दरम्यान गुन्ह्याची व्याप्ती बघता जिल्हा व सत्र न्यायाधीश कदम यांनी सरकार पक्षाशी पोलीस कोठडीची विनंती मान्य केली असून संशयित मोरे यास 06 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिसांना गुन्ह्याचा अधिक सखोल तपासाला वेळ मिळाला आहे. मात्र आतापर्यंत संशयित मोरे यांनी पोलिसांच्या सात दिवसांच्या पोलिस कोचडीत फारसे सहकार्य केले नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत सात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पिडीत सात पैकी सहा विद्यार्थिनी अल्पवयीन आहेत. प्रकरण गंभीर असल्याने चौकशीसाठी समितीची करण्यात येऊन सात दिवसात अहवाल सादर करण्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दोन दिवसांपूर्वी निर्देश दिले आहेत. त्यानुसार चौकशी समिती तपास करत असून लवकरच याचा सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे. 


पीडित मुलींची रवानगी शासकीय निवारागृहात...
पीडित सहा मुलींना पोलिसांनी शासकीय मुलींच्या निवारागृहात हलवले आहे. तसेच अन्य सात मुलींना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. म्हसरूळ शिवारात ज्या रो हाऊसमध्ये भाडेतत्त्वावर आधारश्रम चालवली जात होते. त्या रो हाऊसला पोलिसांनी टाळ्या ठोकले आहे. पीडित अल्पवयीन मुली सोबत पोलिसांकडून संवाद साधला जात आहे. तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या पदाधिकाऱ्यांकडून याप्रकरणी मुलींची चर्चा केली जात आहे. मुलींच्या समुपदेशनावरही भर दिला जात असून त्यांचे मनोबल वाढवले जात आहे.