Nashik Vikhe Patil : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर काय भाष्य करणार? संजय राऊत यांची भविष्यवाणी कधी खरी झाली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, पुढे जाऊन त्यांचा पक्ष त्यांच्याबाबत काय करेल, माहिती नाही, असा सूचक वक्तव्य करत संजय राऊत म्हणजे वैफल्यग्रस्त झालेला माणूस असून काही दिवसांनी त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसेल, अशी खरमरीत टीका राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी केली आहे. 


मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नाशिकमध्ये (Nashik) आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज नाशिक जिल्ह्यातील पहिल्या वाळू डेपोचे (Sand Depo) उदघाटन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. निफाड (Niphad) तालुक्यातील चांदोरी येथे हा वाळू डेपो उभारण्यात आला. यानंतर त्यांनी नाशिक शहरात पत्रकार परिषद घेत माध्यमाशी संवाद साधला. यावेळी मंत्री विखे पाटील संजय राऊत यांच्यावर म्हणाले कि, संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यांनी आपल्या पात्रतेच्या अधिक बोलू नये. संजय राऊत यांनी पुन्हा शिंदे फडणवीस सरकार पडणार असल्याचे वक्तव्य केले. यावर ते म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर काय भाष्य करणार?  संजय राऊत यांची भविष्यवाणी कधी खरी झाली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, पुढे जाऊन त्यांचा पक्ष त्यांच्याबाबत काय करेल, माहिती नाही. 


महसूलमंत्री राधाकृष्ण् विखे पाटील यांनी सुरवातीला कर्नाटक निकालावर (Karnataka Election) आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, सुरवातीचे निकाल येत असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. आता जे निकाल येत आहेत, त्यात खूप फरक नाही. भाजपला खूप मोठा फटका नाही, मात्र पूर्ण निकाल आल्यावर चर्चा होईल. तसेच स्थानिक राज्याचे निवडणुकांचे विषय वेगळे असतात. त्यामुळे हा निकाल केंद्राशी जोडणे बरोबर नाही.  दरम्यान यावर ते म्हणाले कि, अँटी इन्कमबन्सीचा परिणाम जाणवतो. संपूर्ण निकाल आल्यावर केंद्रीय नेतृत्वाची प्रतिक्रिया येईल, असेही ते म्हणाले. 


दरम्यान विखे पाटील पुढे म्हणाले की, सीमा प्रश्न सोडवण्याची भूमिका भाजपची असून विरोधीपक्षाने यावर राजकारण केले. सीमा भागात देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभा घेतल्या असून सीमा भागातील नागरिकांनी भाजपावर विश्वस्त ठेवले. त्यानंतर विखे पाटील यांनी राज्यातील नव्या वाळू धोरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले कि, वाळू माफियांचा मोडकळीस काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही जो धोरण वाळू संदर्भात घेतले आहे, ते यशस्वी होईल. थोडा वेळ लागेल पण आम्ही यशस्वी ठरू असा विश्वास व्यक्त करत काही ठिकाणी याला वाळू माफिया अडचणी आणत आहेत.  मात्र त्यांच्यावर ठोस कारवाईची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुढील महिन्या भरात प्रत्येकांना वाळू 600 रुपयात मिळेल, अशी अपेक्षा राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. 


नाशिक जिल्ह्यातील पहिला वाळू डेपो 


नवीन वाळू धोरण राज्यात लागू झाल्यानंतर त्या अंतर्गत वाळू डेपो ही नवी संकल्पना लागू करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील पहिला वाळू डेपो निफाडमधील गोदावरी नदीतील चांदोरी येथे उभारण्यात आला आहे. या डेपोच अनावरण आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले आहे. सकाळी उदघाटन झाल्यानंतर महसूलमंत्री विखे पाटील हे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात महसुली अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार असून दुपारी दोन वाजता आढावा बैठक सुरू होणार आहे.