Nitin Gadkari Igatpuri : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून एका महामार्गाच्या उदघाटनासाठी ते इगतपुरी (Igatpuri) येथे येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित असलेला नाशिक-मुंबई महामार्गाचा (Nashik Mumbai Highway) प्रश्नावर गडकरी आज काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 
       

  
नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या 226 कि.मी. लांबीच्या 1830 कोटींच्या प्रकल्पांचा लोकर्पण व कोनशिला आनावरण आज दुपारी  इगतपुरी येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर ते नाशिक जिल्ह्यात येत आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी गडकरी येत असतील तर त्यांनी नाशिक मुंबई महामार्गाची पाहणी करावी असा सवाल केला होता. यावर गडकरी काय भूमिका घेतात हे देखील आवश्यक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक मुंबई महामार्गाचा मुद्दा गाजत आहे. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी याबाबत आवाज उठवला आहे. 


नाशिक जिल्ह्यातील गोंदे ते प्रिंपीसदो फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 चे 20 कि.मी लांबीच्या 866 कोटींचे सहापदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी या 37 कि.मी लांबीच्या सटाणा ते मंगरूळ  खंडाचे रूंदीकरण व दर्जोन्नतीकरणाच्या 439 कोटींच्या कामाचे, 10 वा मैल जऊळके-दिंडोरी व आंबेबहुला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 येथे 4.3 कि.मी च्या 211 कोटी रूपयांच्या भुयारी व उड्डाण पूल, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 अ खंबाळे ते पहिणे व शतगाव ते अंबोली या 30 कि.मी लांबीच्या 38 कोटींचे कामाचे मजबूतीकरण, गुरेवाडी फाटा ते सिन्नर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 चे 9 कि.मी लांबी असलेल्या 14 कोटी किंमतीच्या खंडाचे मजबूतीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 अ मार्गावरील 53.500 कि.मी लांबीच्या मार्गावरील 11 कोटींच्या रस्ता सुरक्षा सुधार कार्य, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 पिंपळगाव-नाशिक-गोंदे या 51 कि.मी लांबीच्या मार्गावर 7.5 कोटी किमतीचे एलईडी पथदिवे लावणे या कामांच्या कोनशिलेचे आनावरण  होणार आहे. 


तसेच नांदगाव ते मनमाड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 जे या 21 कि.मी लांबीच्या 253 कोटी रूपयांच्या खंडाचे रूंदीकरण व दर्जोन्ननतीकरणाच्या कामाचे लोकार्पण केंद्रिय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गार्डन व्ह्यू महिंद्रा प्रकल्पाजवळ, मुंबई -आग्रा महामार्ग इगतपुरी येथे करण्यात येणार आहे.  


नाशिक- मुंबई महामार्गाच काय?
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक -मुंबई महामार्गाचा मुद्दा गाजत असून चार तासांचा प्रवास सहा तासांवर गेल्याची ओरड दैनंदिन वाहनचालकांकडून होत आहे. अशातच रस्ते वाहतूक मंत्री गडकरी हे आज एका सहा पदरी महामार्गाच्या उदघाटनासाठी नाशिकला येत आहेत. त्यामुळे नाशिक मुंबई महामार्गाकडे कडे बघा? अशी विनंती अनेक लोकप्रतिनीधींनी  केली आहे.