Nashik Crime : ओझर (Ojhar) येथील अपहरणाची घटना ताजी असतानाच गोदाघाट परिसरातून एकाने 10 महिन्याच्या बालिकेचे अपहरण केल्याची घटना घडली होती. पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा (Panchavati) दाखल झाल्यानंतर मध्यवर्ती गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे वेगाने फिरवत सातपूर (Satpur) मधील घरातून अपहरण झालेल्या बालिकेची 24 तासात सुटका केली. 


नाशिकच्या (Nashik) गोदाघाट परिसरात सुरगाणा (Surgana) तालुक्यातील सोनी पवार, युवराज पवार हे दाम्पत्य वास्तव्यास असून शहरात मोलमजुरी करून ते आपली गुजराण करत आहेत. दरम्यान या आदिवासी कष्टकरी कुटुंबाच्या दहा महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली होती. या प्रकरणी पवार कुटुंबाने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी कुटुंबीयांनी टाहो फोडत मुलीला शोधून काढण्यास सांगितले. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पथकाने तपासाची सूत्रे फिरवत मिळालेल्या माहितीनुसार पथक सातपूरला पोहोचले. येथील एका घरातून संशयताच ताब्यात घेत मुलीची ही सुखरूपपणे सुटका केली.


पवार कुटुंबियांची नजर चुकवून संशयित मधुकर पाटील याने दहा महिन्याची मुलगी पळवली. ही बाब पवार कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्यांनी जवळील पंचवटी पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली. तपास सुरू असताना सातपुर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सातपुर परिसरात पथक पथक संशयितास ताब्यात घेतले. व मुलीची 24 तासांत सुटका केली.


असा लागला तपास 
दरम्यान पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सातपूर परिसरात संशयितांचा मग काढला. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे संजय गामणे हे गुन्हा झाल्यापासुन अपहृत मुलीचे शोधासाठी शहरातील महत्वाचे ठिकाणी गोपनिय बातमीदारामार्फंत लक्ष ठेवुन होते. तसेच स्वतः बसस्टॅंड, रेल्वेस्टॅंड, बाजारपेठ, मार्केट एरिया या ठिकाणी फिरून शोध घेत असतांना रात्री उशिरा संशयित मकरंद भास्कर पाटील रा. आनंद छाया अपार्टमेंट, सातपुर कॉलनी नाशिक याचे बाबत माहिती मिळाल्याने तपास पथकाने संशयिताची माहिती काढुन त्याचा शोध घेतला. तो राहते घरी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी करता  मुलीचे अपहरण केल्याबाबत कबुली दिली. दरम्यान पोलिसांनी मुलगी व संशयितास ताब्यात घेवुन पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे. 


नाशिक शहरात अपहरण वाढतायेत! 
नाशिक शहर परिसरातून दिवसेंदिवस मुलींच्या अपहरणाच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसं[पूर्वी ओझर येथून दोन मुलींचे अपहरण केल्याची घटना समोर आली होती. मात्र नाशिक ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान च्या अंतर्गत या प्रकरणाचा छडा लावला. त्यातून अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. मुलीच्या अपहरणाचे हे रॅकेट थेट मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याला कनेक्टेड होते. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. मात्र रोज एक ना दोन मुली या नाशिकमधून गायब होत असल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.